हेरले / (प्रतिनिधी )
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील जय हनुमान सह. दुध व्याव. संस्थेच्या इमारतीचा भुमीपुजन व पायाभरणी शुभारंभ संस्थेचे संचालक जयवंत चौगुले, सभासद जीवन चौगुले, व आनंदा थोरवत यांच्या शुभहस्ते व सपत्नीक शुभारंभ करण्यात आला.
जय हनुमान दुध संस्थेची स्थापना २०० ७ साली झाली असून संस्थेने कमी कालावधीत दुध संकलनाचा मोठा टप्पा पार केला आहे. सध्या संस्थेचे दररोज १५०० लिटर दुध संकलन असून संस्थेने स्वमालकीची जागा खरेदी केली आहे. सध्या याच जागेवर दोन मजली इमारत बांधकामचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. या इमारतीचा पायाभरणी शुभारंभ केल्याने दुध उत्पादक व सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी चेअरमन सतिशकुमार चौगुले, व्हा.चेअरमन इंदूबाई नलवडे, संचालक महादेव शिंदे , रावसाहेब चौगुले, बाळासो थोरवत, सुरेश कांबरे, शकील हजारी, नेताजी माने, सुभाष मुसळे , महादेव चौगुले, जयश्री यादव, जयश्री रजपूत, धोंडिराम चौगुले, सुनिल सुतार, सचिव आण्णासो पाटील, कर्मचारी विलास घुगरे,यांच्यासह संस्थेचे दुध उत्पादक सभासद मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
फोटो
जय हनुमान दुध संस्थेच्या इमारत पायाभरणी शुभारंभ प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व दुध उत्पादक सभासद
No comments:
Post a Comment