कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 15% लाभांश देण्याची घोषणा पतसंस्थेचे चेअरमन श्री उमर जमादार यांनी 60 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थाना वरुन बोलताना केली. संस्थेस 2022-23 साली ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. संस्थेकडे मार्च 2023 अखेर 40 कोटी च्या ठेवी असून अहवाल सालात 17 लाख 58 हजार नफा झाला असल्याचे जाहीर केले.
संस्थेचे सचिव सुधाकर सावंत यांनी अहवालाचे वाचन केले संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला व सभसदांच्या प्रश्नाबाबत माहिती दिली.ई-बाईक,सोलर करीता 1 लाख 50 हजार रुपये 8.25 % ने देण्याचा उपविधी दुरुस्तीस जनरल सभेने मंजुरी दिली.
या सभेस व्हाईस चेअरमन कुलदीप जठार,खजानीस संजय पाटील,वसंत आडके,भारती सूर्यवंशी,मनीषा पांचाळ,लक्ष्मण पोवार,राजेंद्र गेंजगे,मनोहर सरगर,सुनील नाईक,विजय माळी,विलास पिंगळे,प्रभाकर लोखंडे,नेताजी फराकटे ,प्रदीप पाटील,विजय सुतार उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार उमेश देसाई यांनी मानले.
No comments:
Post a Comment