Sunday, 17 September 2023

हेरलेत अमृत कलश यात्रा‘माझी माती, माझा देश’ अभियानाला प्रतिसाद


हेरले /प्रतिनिधी

  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत ‘माझी माती, माझा देश’ या मोहिमेअंतर्गत १ ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये अमृत कलशांमध्ये माती गोळा करण्यासाठी अमृत कलश यात्रा आयोजन करण्याची सूचना केंद्र व राज्याकडून केली होती. या पार्श्वभूमीवर हेरले (ता. हातकणंगले) येथे प्रभात फेरी काढून  अमृत कलशांमध्ये माती गोळा करण्यासाठी अमृत कलश यात्रा काढण्यात आली.
     अमृत कलश यात्रेची सुरुवात शनिवार (ता.१६) ग्रामपंचायत कार्यलयाकडून सरपंच राहुल शेटे उपसरपंच 
महंमदबक्तीयार जमादार  ग्रामविकास अधिकारी बी. एस. कांबळे  सर्व 
ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी राहूल निंबाळकर, संजय खाबडे यांच्या हस्ते झाली.या यात्रेमध्ये केंद्र शाळा, कन्या शाळा व शाळा नंबर दोनचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.माळभागावरून  वाजत गाजत सुरवात करण्यात आली. ‘माझी माती, माझा देश’ या मोहिमेत प्रभागनिहाय फिरुन अमृत कलशांमध्ये माती गोळा करण्यात आली.या कार्यक्रमास गावातील नागरीकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे अमृत कलश यात्रा यशस्वी झाली.

       फोटो
हेरले येथे माझी माती माझा देश या मोहिमांतर्गत माळभाग येथे महिला 
अमृत कलशामध्ये माती घालत असताना

No comments:

Post a Comment