पुलाची शिरोली
येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी ए.वाय.कदम यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय 'आदर्श ग्रामविकास अधिकारी' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आदर्श ग्रामविकास पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एकाच व्यक्तीची निवड केली जाते. सन २१- २२ या सालाकरीता आनंदा यशवंत उर्फ ए.वाय . कदम यांची निवड करण्यात आली आहे. या कालावधीत त्यानी किणी व पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथे यशवंत पंचायत राज यासह शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवून आदर्श गाव बनविण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. तसेच कदम यांनी पन्हाळा व हातकणंगले तालुक्यातील नामांकीत ग्रामपंचायतीमध्ये कामाचा ठसा उमटविला आहे.
या निवडीमुळे कदम यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होवू लागला आहे.
No comments:
Post a Comment