कोल्हापूर / प्रतिनिधी
कोनवडे ता. भुदरगड येथे संपन्न झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड च्या पै. राजवर्धन पांडुरंग पुजारी याने 70 किलो फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला त्याची बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.पै.विवेक घाटगे यांने 82 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला.क्रीडा शिक्षक व्ही. आर. गडकरी यांचे मार्गदर्शन लाभले.विश्वनाथराव पाटील लाल आखाडा कुस्ती संकुलात तो वस्ताद तुकाराम चोपडे, पांडुरंग पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई साहेब, अध्यक्षा श्रीमती शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत , चेअरमन डॉ. मंजिरी देसाई मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर, युवा नेते दौलतराव देसाई, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर,शाळा समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी .पाटील, उपमुख्याध्यापक एस.बी.सुर्यवंशी, पर्यवेक्षक एस बी.साठे यांचे प्रोत्साहन लाभले.
फोटो
राजवर्धन पुजारी
No comments:
Post a Comment