पेठ वडगाव /प्रतिनिधी
वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावमध्ये घटस्थापना दिनी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर कौन्सिल मेंबर, कोजिमाशि चेअरमन तथा प्राचार्य लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर यांनी सरस्वतीची मूर्ती विद्यालयास अर्पण केली.ढोल ताशाच्या गजरात विद्येची देवता माता सरस्वतीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. पुजा विधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दिलीप जोशी यांनी केली. पूजा जेष्ठ शिक्षक डी.एस.कुंभार व त्यांच्या पत्नी विमल कुंभार यांच्या हस्ते करण्यात आली.
सरस्वती मूर्तीची रथामधून मिरवणूक वडगाव शहरातील प्रमुख मार्गावरून काढली.यामध्ये सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सोहळ्याची शोभा वाढवली. एनसीसी विद्यार्थी विद्यार्थिनी, म्युझिक सिस्टीम विभाग, विद्यार्थिनी लेझीम पथक, विद्यार्थी ढोल ताशा पथक यांनी उत्कृष्ट वादन केले.
या कार्यक्रमामध्ये उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे ,पर्यवेक्षिका सौ.आर.आर. पाटील, संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे, तंत्र विभाग प्रमुख ए. एस. आंबी, कार्यालयीन प्रमुख अतुल पाटील, प्रतिभा मोहिते,ज्येष्ठ शिक्षक डी. एस. कुंभार, परीक्षा विभाग प्रमुख डी. ए. शेळके ,के. एच. भोकरे, सौ.एस. एस. चव्हाण, रमेश पाटील,अकबर पन्हाळकर,प्रताप पाटील, संजय गोणी, रविंद्र वासुदेव यांचे सहकार्य लाभले .या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन एम. व्ही. कुलकर्णी यांनी केले. यामध्ये सौ. एस. एस. चौगुले, एस. ए. पाटील,श्रीमती आर. ए. माने, ज्युनिअर कॉलेज शिक्षक वृंद , विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, जी. एस., एल आर. सांस्कृतिक मंत्री,यांचे सहभागासह मोलाचे सहकार्य लाभले.
फोटो कॅप्शन
वडगाव विद्यालयामध्ये सरस्वती देवीच्या मूर्तीची जेष्ठ शिक्षक डी.एस.कुंभार व त्यांच्या पत्नी विमल कुंभार पूजा व आरती करतांना
No comments:
Post a Comment