Friday, 27 October 2023

माध्यमिक शिक्षण संघटनांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्द.-- माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर


कोल्हापूर /प्रतिनिधी
   जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटना सहविचार सभा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ येथील सभागृहामध्ये संपन्न झाली. या सभेमध्ये कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक  संघटनांचेअध्यक्ष, सचिव व पदाधिकारी उपस्थित होते.
    या वेळी २९ उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधीनी आपआपल्या संघटनेतील प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये वरीष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणी, कालबध्द पदोन्नती, अर्धवेळ शिक्षकांचे प्रश्न, सीएचबी काम करणारे शिक्षकांचे प्रश्न, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी स्लिपा वितरीत करणे, वेळेत देणे, शाळांचे अनुदान वेळेत मिळावे, ऑनलाईन माहिती भरतांना येणाऱ्या अडचणी संदर्भात प्रशिक्षण घेणे, पेन्शन पेपरवरती शिक्षणाधिकारी यांच्या सह्या करणे, पे युनिटमधील कर्मचाऱ्यांकडून व माध्यमिक शिक्षण विभागातील लिपीकांच्याकडून वागणूक योग्य प्रकारे मिळावी, अन्य शाळांकडून आलेल्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट स्विकारणे बाबत, विविध शिष्यवृत्त्यांच्या मागणी प्रस्तावांची परिपत्रके १५ दिवस अगोदर पाठवीत, न्यू टयॅब वेळ वाढवून द्यावी, सर्व शिक्षा व समग्र शिक्षा निधी बाबत, शैक्षणिक सहलीची परवानगी बरोबरच खेळाडूसाठी बसेस परवानगी मिळणे, ग्रंथपालांच्या समस्येबाबत कँप लावणे आदी विषयांवर समग्र चर्चा झाली.
    शाळांच्यामध्ये दैंनदिन कामकाज करत असताना, शैक्षणिक दर्जा टिकविणे व गुणवत्ता वाढविणे या बाबत चर्चा करून शैक्षणिक क्षेत्रात उदभवणाऱ्या समस्या, शैक्षणिक काम निकोप वातावरणात पार पडण्यासाठी समस्या सोडविल्या जातील. त्यासाठी कटिबध्द असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी या बैठकीमध्ये सांगितले.
  या बैठकी प्रंसगी  शिक्षणाधिकारी (योजना ) अनुराधा म्हेतरे, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, अधीक्षक प्रवीण फाटक, विस्तार अधिकारी डी. एल. पाटील, जयश्री जाधव, रत्नप्रभा दबडे ,विश्वास सुतार, दगडू कुंभार, निलेश महाळुंगेकर, नितीन खाडे, कल्पना पाटील, अश्विनी पाटील, पुनम ठमके, अजिंक्य गायकवाड, सुशांत शिरतोडे, महेश पवार, सूर्यकांत पाटील, राज म्हेंदकर, उत्तम वावरे, गौरव बोडेकर आदी माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी व लिपीक वर्ग उपस्थित होते.
   या सहविचार सभेमध्ये एस .डी. लाड, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, व्ही. जी. पोवार, डॉ. डी एस घुगरे,खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, आर. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, उदय पाटील, के के पाटील, प्रभाकर हेरवाडे, शिवाजी माळकर, काकासाहेब भोकरे, मिलींद बारवडे, मनोहर जाधव, अरुण मुजुमदार, जगदीश शिर्के, एन एम पाटील, विष्णू पाटील, इरफान अन्सारी, अजित रणदिवे, कृष्णात पोतदार, बाजीराव साळवी आदींनी शैक्षणिक प्रश्न उपस्थित केले. २९ शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
    फोटो 
संघटना सहविचार सभेत बोलतांना
 माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर

No comments:

Post a Comment