Friday, 6 October 2023

पुलाची शिरोलीच्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी सतीश पाटील यांची एकमताने निवड

हेरले/ प्रतिनिधी
पुलाची शिरोलीच्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सतीश भीमराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. पद्मजा करपे होत्या. 
यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
 सतीश पाटील यांनी यापूर्वीही सुमारे चार ते पाच वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यांनी काम करताना कोणताही जाती पातीचा  भेदभाव न बाळगता सर्व घटकांना योग्य न्याय देण्याचे काम केले आहे. तसेच त्यांचा गावातील असलेला मोठा  जनसंपर्क, सामाजिक कार्याची आवड व संपूर्ण वेळ काम करण्याची असणारी तळमळ यामुळेच त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळाली असल्याचे सरपंच करपे यांनी सांगितले .
 यावेळी बोलताना नुतन अध्यक्ष  सतीश पाटील म्हणाले,  शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या आदेशाची पुरेपूर अंमलबजावणी करून त्यांच्या धोरणानुसारच ही समिती निवडली जाईल . तसेच प्रत्येक क्षेत्रातील कार्यक्षम व्यक्तींना या समितीमध्ये संधी देणार असल्याचे सांगितले. 
 या निवडी साठी माजी आमदार अमल  महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले.
 यावेळी सरपंच सौ पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी, शिरोली विकासचे  संचालक धनाजी पाटील, उद्योजक योगेश खवरे, माजी उपसरपंच कृष्णात करपे,  प्रकाश कौंदाडे , राजेश पाटील, बबन संकपाळ, दिपक यादव,  सदाशिव संकपाळ, रावसाहेब सोडगे, संपत संकपाळ, बाळासो पाटील, यांच्यासह ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्राम विकास अधिकारी ए.वाय.कदम उपस्थित होते.
फोटो.....
येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितेचे नुतन अध्यक्षसतिश पाटील यांचा सत्कार करताना सरपंच सौ. पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी, राजेश पाटील, प्रकाश कौंदाडे, धनाजी पाटील, बबन संकपाळ व इतर

No comments:

Post a Comment