हेरले / प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी हेरले (ता हातकणंगले) येथे मराठा तरुणांनी बुधवारी एक दिवसीय लक्षणीय उपोषण झेंडा चौक शिवतीर्थ येथे केले.
आरक्षणाबाबात सरकारने दिलेल्या मुदतीत आश्वासनाची पूर्तती केली नसल्याच्या निषेधार्थ मराठा आंदोलनाचे जरांगे-पाटील यांनी पुन्हा अमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सकाळी नऊ वाजता हेरले गावातील मराठा समाजाच्यावतीने ‘एक मराठा कोठी मराठा’च्या घोषणा देत उपोषणला सुरवात केली. तरुणांच्या या उपोषणाला गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.यावेळी दिनांक २ रोजी हेरले गाव दुपारनंतर पूर्ण बंद करण्याची तसेच सायंकाळी ६ वाजता गावातून मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.अशी घोषणा करण्यात आली.
या एक दिवसीय उपोषणास माजी सभापती राजेश पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस मुनिर जमादार, सरपंच राहुल शेटे, तंटामुक्त अध्यक्ष अमर वडड, जवाहर साखर संचालक आदगोंडा पाटील,सर्जेराव भोसले,अमित पाटील,हिम्मत बारगिर,शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संदीप शेटे,विनोद वडड,नौशाद देसाई, अबूबकर जमादार,अमीनुद्दीन पेंढारी,बाळगोंड पाटील,राहुल चौगुले,तसेच गावामधील सर्व समाजाने एकमुखी पाठिंबा दिला.यावेळी हातकणंगले पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी भेट देऊन आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले.
यावेळी विजय कारंडे ,माजी उपसरपंच कपिल भोसले ,ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले ,मनोज पाटील,सयाजी गायकवाड,विश्वजीत भोसले ,आदिक इनामदार,नंदकुमार माने,उदय भोसले,शरद माने,संग्रामसिंह रुईकर, सोमनाथ भोसले,ऋषिकेश लाड,मनोज जाधव ,सोमनाथ भोसले,
डॉ. संतोष कागले,दीपक जाधव,प्रवीण सावंत,संदीप मिरजे,संतोष भोसले,यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो:-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हेरले येथील तरुणांनी एकदिवसीय उपोषन केले प्रसंगी.
No comments:
Post a Comment