Sunday, 19 November 2023

२४ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा भरला आठवणींचा वर्गमुरगुड विद्यालयला केली लाखाची मदत

कोल्हापूर / प्रतिनिधी

मुरगुड विद्यालय हायस्कूल  ज्युनिअर कॉलेज या शाळेच्या इयत्ता दहावी 1999 च्या बॅचच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी कडून गुरु शिष्यांचा स्नेह मेळावा मुरगुड विद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समवेत उत्साहाने पार पडला, तब्बल 24 वर्षानी जणु आठवणींचा वर्ग या ठिकाणी भरला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपमुख्याध्यापक एस. बी .सूर्यवंशी तर तर प्रमुख पाहुणे  कोल्हापूर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य शिवाजीराव सावंत होते.
    आपण ज्या शाळेत शिकलो आणि  जिवनात यशस्वी झालो त्या आपल्या शाळेचे आणि शिक्षकांचे काहीतरी आपण देणे लागतो हा उद्देश ठेवत  हा कार्यक्रम पार पडला ,यावेळी शिक्षकांना वाचनीय पुस्तके भेट देत तसेच शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत तब्बल 75 हजाराचे  पंचवीस बेंच, पचंवीस हजाराचे सॅनिटरी नॅपकिन पॅड मशीन व सीलिंग फॅन अशी एकुण एक लाखाची भेटवस्तूची मदत शाळेसाठी देवू केले.
     याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे शिवाजीराव सावंत  म्हणाले, या शाळेमध्ये अनेक मेळावे झाले पण हा  गुरु शिष्यांचा स्नेह मेळावा म्हणून एक नवीन उपक्रम या 1999 च्या बॅचने घालून देत शाळेसाठी एक अविस्मरणीय भेट म्हणून बेंच देऊ केले .ही गोष्ट पुढच्या पिढीला प्रेरणा देणारी व उल्लेखनीय असल्याचे सांगितले याचं बेंचवर बसून इथून पुढची पिढी ज्ञानार्जन करून देशातील विविध क्षेत्रात यशस्वी होईल असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ,एस बी,सुर्यवंशी ,सी.आर. माळवदे,   इंदलकरसर ,इ. बी. देशमुख,आर.डी. लोहार, पी. पी. पाटील , अनिल पाटील, आदि शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले, 
यावेळी शाळेचे पर्यवेक्षक एस.डी. साठे,  कागलचे मुख्याध्यापक टि.ए. पोवार,आर.एच. पोळ,एम. एम.रेडेकर, एस ए पाटील,आर.जी.पाटील आनंदराव कल्याणकर,पी.एन. पाटील ,एम एच खराडे,यांच्या सह अनेक आजी माजी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी ,माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी संख्येने उपस्थित होते
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल चौगले ,स्वागत व सूत्रसंचालन  सागर कुंभार तर आभार सचिन सुतार यांनी मानले

 फोटो...
   मुरगुड.. येथील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येथे सन 1999 चे दहावीचे माजी विद्यार्थी आपल्या शिक्षक वृंदा समवेत

No comments:

Post a Comment