Saturday, 23 December 2023

सर्व खाजगी शाळांकरिता 1 कोटी 47 लाखाची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

कोल्हापूर/ प्रतिनिधी
"भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा "हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळाकरिता राबवण्यात येत आहे. पहिल्यांदाच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांचा यामध्ये सहभाग होणार आहे केंद्र, तालुका ,जिल्हा, विभाग व राज्य अशा एकूण पाच स्तरावरून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावर शंभर गुणांचे गुणांकन करून शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे हे मूल्यांकन दोन विभागात विभागलेले आहे
अ) विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग-साठ गुण
1)शाळा व परिसराचे सौंदर्यकरण दहा गुण 
2) विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णयातील सहभाग- पंधरा गुण
3) शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम -दहा गुण
4) शाळेची इमारत व परिसर स्वच्छता- दहा गुण
5) राष्ट्रीय एकात्मते प्रोत्साहन देण्याबाबत उपक्रम -पाच गुण
6) विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन देशी  खेळांना प्राधान्य -दहा गुण
ब) शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित विविध उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग- चाळीस गुण 
1) आरोग्य -पंधरा   गुण    
2) आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास -दहा गुण
3) भौतिक सुविधा व अध्ययन अध्यापनात सुलभता आणण्यासाठी कार्पोरेट संस्था कडून लोक सहभाग- तीन गुण
4) तंबाखू मुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा व पोषणशक्ती अभियान उपक्रम -पाच गुण
5) विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थी पालक यांचा सहभाग -पाच गुण 
तालुकास्तर ते राज्यस्तर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख रक्कम पारितोषिक देण्यात येणार आहे . प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे तालुकास्तरावर 3 लाख, 2 लाख व 1लाख ,जिल्हास्तरावर 11लाख ,5 लाख व 3लाख, विभाग स्तरावर 21 लाख ,11लाख व 7लाख तर राज्यस्तरावर 51 लाख 21 लाख व अकरा लाख अशा भरघोस बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे शासनामार्फत केंद्र स्तरावर केंद्रप्रमुख, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी ,जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी ,विभाग स्तरावर शिक्षण उपसंचालक व राज्यस्तरावर  शिक्षण आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करून प्रत्येक स्तरावर मूल्यमापन करण्यात येणार आहे याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.  सर्व शाळांनी आपले स्तरावरून स्वमूल्यमापन करून केंद्र स्तरावरील स्पर्धेकरिता तयारी करणे बाबत याद्वारे शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. एकनाथ आंबोकर यांनी आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment