Thursday, 11 January 2024

गुणवंत, संस्कारक्षम आदर्श पिढी निर्माण करणारे हे संकुल : डॉ.डी.एस.घुगरे


हेरले /प्रतिनिधी
गुरुकुल प्राथमिक व ग्रीन व्हॅली प्रायमरी विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

पेठ वडगांव: परिसरातील जवळपास २२ गावातील विद्यार्थी या शाळेत शिकतात. लहान मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी आणि गुणवंत, संस्कारक्षम आदर्श पिढी निर्माण करणारे हे संकुल सुरू केले आहे.असे प्रतिपादन आदर्श गुरुकुल अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी.एस.घुगरे यांनी केले. ते गुरुकुल प्राथमिक विभाग व ग्रीन व्हॅली प्रायमरी विभागाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

श्री घुगरे पुढे म्हणाले की"
या संकुलातील विद्यार्थ्यांचा कला ,क्रीडा ,शैक्षणिक,सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणूनच अल्पावधीतच महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातील उत्तम शाळांपैकी  एक आदर्श गुरुकुल संकुल आहे. हे संकुल एक कुटुंब आहे या कुटुंबामध्ये पाच हजार  व्यक्ती आहेत एकही व्यक्ती चुकणार नाही किंवा चुकीचं वागणार नाही याची कुटुंबप्रमुख म्हणून मला खात्री आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन विविध क्षेत्रात यशस्वी असणारे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जय हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष बजरंग माने उपअध्यक्ष राजाराम जाधव व सर्व संचालक मंडळ,आदर्श गुरुकुल अकॅडमीच्या सचिव तथा मुख्याध्यापिका सौ.एम.डी.घुगरे,पर्यवेक्षक एस.जी.जाधव,प्रशासक एस.ए.पाटील, ग्रीन व्हॅली प्रायमरी विभाग प्रमुख सौ.एस.एस गिरीगोसावी, गुरुकुल प्राथमिक विभाग प्रमुख सौ.एम.एस चौगुले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment