हेरले / प्रतिनिधी
महेंद्र नरसिंगा कांबरे मौजे वडगांव (ता. हातकणंगले) यांची हातकणंगले तालुका काँग्रेस (आय) कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
आमदार राजुबाबा जयवंतराव आवळे यांचे शिफारशिने हातकणंगले तालुका काँग्रेस (आय) कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी महेंद्र कांबरे यांची निवड केली. काँग्रेस (आय) पक्ष वाढविण्याकरीता व काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्याकरीता आपली तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आहे या आशयाचे नियुक्ती पत्र नुकतेच त्यांना प्रदान करऱ्यात आले.या निवडीसाठी विशेष सहकार्य आमदार राजू बाबा आवळे,शशिकांत खवरे, बाजीराव सातपुते,भगवानराव जाधव, उत्तम पाटील, शिकतील अत्तर, डॉ. विजय गोरड, सचिन चौगुले यांचे सहकार्य लाभले.
फोटो
मौजे वडगावचे महेंद्र कांबरे यांना निवड पत्र देऊन सत्कार करतांना आमदार राजूबाबा आवळे व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment