Saturday, 3 February 2024

रामभक्त निवास पाटील यांचा संकल्प अभिमानास्पद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

     
हेरले / प्रतिनिधी                 
  तब्बल ३१ वर्ष राम मंदिरासाठी अनवानी राहिलेल्या रामभक्त निवास पाटील यांचा संकल्प अभिमानास्पद आहे,असे गौरवोद्गगार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्तानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित  आयोजित श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड गडकोट मोहिमेच्या समारोपाच्या  कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतापगड येथे आले होते.
      शिये (ता. करवीर ) येथील रामभक्त निवास पाटील हे राम मंदिर व्हावे म्हणून तब्बल ३१ वर्ष अनवानी राहिले होते. आणि त्यांचा हा संकल्प २२ जानेवारीला राम लल्लांची मूर्ती प्रतिष्ठा झाल्याने पूर्णत्वास आला.आणि २८ गडकोट मोहिमेत अनवाणी सहभाग घेतला याबाबतची माहिती धारकरी महेश राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.यावर मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही संकल्प केला आणि तो पूर्णत्वास  आला हे तुमचे भाग्य आहे.आणि तुमच्या या संकल्पचा आम्हाला ही अभिमान आहे.
 यावेळी महेश पाटील,संग्राम पाटील, आशिष पाटील, सिंघण जाधव,महादेव पाटील, गजानन मोरे, बाबासो काशिद, कार्तिक राऊत  हे धारकरी  उपस्थित होते

...........................................

फोटो : 
शिये : येथील रामभक्त  निवास पाटील यांचे संकल्प पूर्तीबद्दल कौतुक करताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे.

No comments:

Post a Comment