Sunday, 25 February 2024

पेठ वडगावचे आदर्श गुरुकुल विद्यालय जिल्ह्यात आदर्श


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यात प्रथम
हेरले /प्रतिनिधी

पेठ वडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज जिल्ह्यात आदर्शवत ठरली आहे. महाराष्ट्र शासनाकडून आयोजित केलेल्या मुख्यमंत्री "माझी शाळा सुंदर शाळा" या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच पुढील विभागीय स्तरावरती निवड झाली आहे.यापूर्वी केंद्र स्तरावर व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.या आय एस ओ मानांकन प्राप्त शाळेने आत्तापर्यंत महाराष्ट्र शासन शिवछत्रपती वनश्री पुरस्कार, १ लाख ४ हजार ४४४ सूर्यनमस्कार या अनोख्या उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. शिव विचार दौड व ५५५ विद्यार्थ्यांच्या सहभागाने शिवचरित्र पारायण सोहळा साजरा केला या उपक्रमाची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली.मुख्याध्यापक संघाकडून स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण समितीकडून इको फ्रेंडली व ग्रीन स्कूल अवॉर्डने सन्मानित केले आहे.कचऱ्यावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प, अपारंपारिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, वेस्ट वॉटर  पुनर्वापरासाठी E.T.P  प्रकल्प, मातृ- पितृ कृतज्ञता सोहळा माजी विद्यार्थी मेळावे, विविध देशी व विदेशी खेळांच्या मार्फत हजारो विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाले आहेत. स्कॉलरशिप एन. एम.एम.एस परीक्षा डाॅ.होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा तसेच शाळा सिद्धि A1 ग्रेड प्राप्त, शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात शाळेतील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. तसेच शाळेच्या हजारो माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैज्ञानिक, कृषी, संशोधन  अशा विविध स्तरावर यश संपादन केले आहे.

या यशस्वी कामगिरीसाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. डी.एस.घुगरे मुख्याध्यापिका सौ.एम.डी घुगरे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली.पर्यवेक्षक एस जी जाधव व प्रशासक ए.एस. पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

मुख्यमंत्री "माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानांतर्गत आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम आलो आहोत ही बाब आनंदाची आहे.आम्ही राज्याची तयारी देखील केली आहे.आम्हाला आशा आहे की आम्ही राज्यात देखील यशस्वी कामगिरी करू

मुख्याध्यापिका
सौ.महानंदा घुगरे

No comments:

Post a Comment