हेरले / प्रतिनिधी
अध्यापक डॉ. दीपक शेटे यांनी दुर्मीळ मापनाच्या विविध संग्रहातून नव्या पिढीला मापनाचा इतिहास कळावा, या दृष्टीने उभारलेली गणितायन लँब नवसंजीवनीच आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.
नागाव (ता. हातकणंगले) येथे सोमवारी सुमारे ३००० पेक्षा जास्त मापने असलेल्या गणितायन लँबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सचिव सुभाष चौगले प्रमुख पाहुणे होते. शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, गणिततज्तज्ञ विलास आंबोळे, सुधाकर तोडकर, प्राचार्या महानंदा घुगरे प्रमुख उपस्थित होत्या.
सुभाष चौगले म्हणाले की, देशातील विविध ठिकाणाहून डॉ. शेटे यांनी दुर्मीळ मापनांचे केलेले संकलन विद्यार्थ्यांना गणित विषयाची जिज्ञासा वाढविणारे ठरत आहे. डॉ. आंबोकर म्हणाले, विद्यार्थ्यांना गणितायनमधील मापनाचा इतिहास जाणून घेण्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा.
राजेंद्र पिस्टे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विवेक शेटे यांनी आभार मानले. यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष सर्जेराव लाड, शिवाजी विद्यापीठाच्या गणित विभागप्रमुख प्रा.डॉ. एस. एच. ठकार, प्रा.डॉ. शिवाजी साबळे, सुजाता शेटे, विजय गायकवाड, सदाशिव दान्ननवर , महादेव दान्ननवर आदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment