Thursday, 7 March 2024

आदर्श गुरुकूल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पेठ वडगाव शाळेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थित शिक्षणमंत्री मा. दीपकजी केसरकर यांच्या हस्ते २१ लाखाचे बक्षीस

हेरले /प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान २०२३- २०२४ स्पर्धेत कोल्हापूर विभागातून प्रथम

 पेठ वडगाव: मंगळवार दि.५ मार्च, २०२४ रोजी टाटा सभागृह, नरिमन पॉईंट , मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान २०२३- २०२४ स्पर्धेचे पारितोषिक समारंभ मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,शिक्षणमंत्री मा. दीपकजी केसरकर यांच्या उपस्थितीत अत्यंत आनंदात व दिमाखात झाला. या स्पर्धेत आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि. कॉलेज,पेठ वडगाव या शाळेस कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थित शिक्षणमंत्री मा. दीपकजी केसरकर यांच्या हस्ते रू. २१ लाख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय घुगरे , मुख्याध्यापिका सौ. महानंदा घुगरे , पर्यवेक्षक शरद जाधव, प्रशासक संतोष पाटील , विद्यालयाचे इतर शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधींनी यांनी स्विकारला . या स्पर्धेत राज्यातून   १ लाख ३ हजार ३१२ शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ६४ हजार ३१२ शासकीय शाळा आणि ३९ हजार खाजगी शाळांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment