हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता: हातकणंगले ) येथील हेरले ते मौजे वडगाव दरम्यान सुरेश पाटील यांच्या मळ्या शेजारी रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीला संरक्षक कठडाच अस्तित्वात नाही तेथे केवळ पत्र्याची साधी पाने आडवी लावून सार्वजनिक बांधकाम विभागाने तसदी घेतली आहे त्यामुळे विहीर असल्याचे निदर्शनास येत नाही तसेच या ठिकाणचा रस्ता खचला आहे त्यामुळे येथील रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून वाहनधारकांना कसरत करीत आपली वाहने चालवावी लागतात.
सन २०२१ जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अती वृष्टी झाली होती. त्यावेळी या रस्त्यालगत असणाऱ्या विहीरीचा भाग खचला त्यामुळे रस्त्याचा निम्मा भाग विहीरीत कोसळला. गेली तीन वर्षे होत आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा लोकप्रतिनिधींनी या समेस्यावर उपाय योजना केली नाही. कित्येक वेळा अधिकारी व
लोकप्रतिनिधी यांनी या रस्तावरून प्रवास केला आहे. मात्र त्यांना रस्त्याचा हा मृत्यूचा सापळा असणारी समस्या दिसत नसेल का? हा संशोधनाचा मुद्दा ठरत आहे.
या रस्त्यावरून रोज शाळेच्या बसेस व इतर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे या विहिरीला संरक्षक कठडा बांधणे आवश्यक आहे. या प्रकरणी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद,कोल्हापूर यांनी या प्रकरणी लक्ष घालावे व तात्काळ या ठिकाणी संरक्षक कठडा बांधून ही समस्या सोडवावी अशी जनतेतून मागणी होत आहे.
फोटो
हेरले ते मौजे वडगाव दरम्यान सुरेश पाटील यांच्या मळ्या शेजारी रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीला संरक्षक कठडाच अस्तित्वात नसल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
No comments:
Post a Comment