हेरले / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीय संघटनेची राज्यकार्यकारिणीची सभा नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यकारणीच्या सभेत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष काकासाहेब हरिभाऊ भोकरे यांची राज्य कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
काकासाहेब भोकरे हे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून गेली पंधरा वर्षे जिल्ह्यात काम करत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयासह पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड यांच्या समवेत त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन नाशिक येथे मुंबईचे लोकप्रिय शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक भरती कार्याध्यक्ष सुभाष मोरे, शिक्षक भारती प्राथमिकचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या शुभहस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या निवड कामी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे कौन्सिल सदस्य दौलत देसाई, पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड, तसेच कोजीमाशीचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक बाळ बेळेकर यांचे सहकार्य लाभले.
फोटो
काकासाहेब भोकरे यांना मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक भरती कार्याध्यक्ष सुभाष मोरे, शिक्षक भारती प्राथमिकचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या शुभहस्ते त्यांना राज्य उपाध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले.
No comments:
Post a Comment