हेरले /प्रतिनिधी
पुलाची शिरोली ग्रामपंचायतच्या वतीने पिर अहमदसो व बालेचाँदसो उरूस व काशिलिंग बिरदेव यात्रे निमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत सांगली तालमीचा मल्ल हरियाणा केसरी प्रवीण भोला यांनी आंतरराष्ट्रीय संकुल पुणे मल्ल गणेश जगताप याला गुणावर पराभूत केले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत समीर देसाई बुचडे कुस्ती केंद्र यांनी सेनादलाचा संग्राम पाटील यास पोकळ घिस्सा डावावर आसमान दाखवले. दसरा मैदान येथे आयोजित कुस्ती मैदानाचे उद्घाटन माजी उपसरपंच कृष्णात करपे, राजेश पाटील प्रकाश कौंदाडे विजय जाधव, संपत संकपाळ, विठ्ठल पाटील यांच्या हस्ते झाले महिला गटात दोन लढती झाल्या. इतर विजेते असे प्रदीप ठाकूर, वैभव हुबाळे, रोहन रणदिवे, शुभम मगर, आदर्श पाटील अभिजीत पवार, सागर राणगे, तौफिक सनदी, अथर्व चव्हाण ,विघ्नेश केसरकर, आयर्न रानगे.
पंच म्हणून राम सारंग ,विठ्ठल पाटील, संदीप पाटील, बापूसो पुजारी युवराज पुजारी लखन घाटगे यांनी काम पाहिले तर ईश्वरा पाटील यांनी निवेदक म्हणून भूमिका बजावली. या कुस्ती स्पर्धेवेळी प्रकाश कौंदाडे, अविनाश कोळी, महादेव सुतार, विजय जाधव, संपत संकपाळ, बाजीराव पाटील,धनाजी पाटील, विठ्ठल पाटील, दीपक यादव ,योगेश खवरे, श्रीकांत कांबळे , महमद महात, राजहंस पाटील, शिवाजी समुद्रे, संदीप शिंदे, हिदायत्तुल्ला पटेल, आरीफ सर्जेखान, सागर कौंदाडे, बटील देसाई आदी उपस्थित होते.
फोटो.....
पुलाची शिरोली येथील कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लास बक्षीस देताना सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व मान्यवर.
No comments:
Post a Comment