हेरले / प्रतिनिधी
बारावी बोर्ड परीक्षेच्या सायन्स विभागामध्ये हेरलेतील दिव्यांग विद्यार्थीनी कु.भाग्यश्री संदीप जाधव हिने रुकडी केंद्रात दुसरा क्रमांक पटकाविला.
महात्मा गांधी जुनियर कॉलेज रूकडी मधील कु.भाग्यश्री संदीप जाधव (रा. हेरले) या विद्यार्थिनीने
८९ टक्के गुण मिळविल्याने तीचा रुकडी केंद्रात दुसरा क्रमांक आलाआहे. तीच्या या यशाने सर्वत्र कौतुक होत आहे. तीच्या या यशाबद्दल रुकडी गावचे ग्रामपंचायत सदस्य पप्पू मुरूमकर,सुरज खोत युवा सेना शहर प्रमुख रूकडी, अभिषेक मगदूम सामाजिक कार्यकर्ते माणगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
फोटो
महात्मा गांधी जुनियर कॉलेज रूकडी मधील भाग्यश्री संदीप जाधव (रा. हेरले) या विद्यार्थिनीने
८९ टक्के गुण मिळविल्याने तिचा रुकडी केंद्रात दुसरा क्रमांक आलाआहे तिचा सत्कार करतांना मान्यवर
No comments:
Post a Comment