हेरले / प्रतिनिधी
नागाव येथील सुनिल ऐतवडे या कट्टर शिवभक्त युवकाने 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्याच्या अन्य 6 या साथीदारासोबत कोल्हापूर ते रायगड असा 500 किलोमीटरचा प्रवास सायकलने पार पाडला. या उपक्रमात भिमराव सुतार-शिरोली पुलाची, राम कारंडे व समर कारंडे - कोल्हापूर,जयदीप पाटील -पाचगाव ,सिद्धार्थ केसरकर- गारगोटी दिपक सावेकर- कोल्हापूर यांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे या उपक्रमात समर कारंडे ह्या 13 वर्षाच्या लहान मुलाने तसेच 63 वर्षाच्या वयोवृद्ध भीमराव सुतार व दीपक सावेकर यांनीही रायगड पर्यंत अंतर सायकलने पार पाडले. हा उपक्रम फिटनेस आयकॉन अक्षय कुमार फॅन्स क्लब कोल्हापूर यांच्या द्वारे राबवण्यात आला होता. या उपक्रमाला माजी खासदार संभाजी राजे यांचे मोठे सहकार्य लाभले. या सायकल प्रवासाला मंगळवार दिनांक 4 जून रोजी छत्रपती शिवाजी चौक कोल्हापूर येथे अभिवादन करून प्रवासाला सुरुवात झाली. रायगड येथे बुधवार दिनांक 5 जून रोजी सायंकाळी सहा वाजता हे सर्वजण रायगडच्या पायथ्याला पोहोचले.तसेच संपूर्ण रायगड च्या पायऱ्या चालत चढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. वाटेत त्यांना विविध लोकांचे प्रोत्साहन,सहकार्य लाभले.सायकलवरून येऊन या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम हे फक्त कोल्हापूर करच करू शकतात अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. अशा या शिवभक्त मावळ्यांना सर्वांच्याकडून या उपक्रमाबद्दल कौतुकाची थाप मिळत आहे.
No comments:
Post a Comment