Wednesday, 26 June 2024

हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने राजर्षीछत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन




हेरले /प्रतिनिधी

हेरले  (ता हातकणंगले)  येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतीमेस सरपंच राहुल शेटे  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व बाळगोंडा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 
  
          यावेळी,उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील,अर्जुन पाटील, उर्मिला कुरणे,  राकेश जाधव,राहुल चौगुले ग्रामविकास अधिकारी बी एस कांबळे,आदीसह ग्रामपंचायत कर्मचारी राहुल निंबाळकर,  संजय  खाबडे,  इस्माईल खतीब,मनोज लोखंडे आदी
उपस्थित होते.

चंद्रप्रभा विकास सेवा सोसायटीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

हेरले / प्रतिनिधी

 गल्लीपासून दिल्लीपर्यंत देश मजबूत होण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहूंच्या विचारांची गरज आहे. कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम दिसतोय, तो छत्रपती शाहूंच्या सामाजिक कार्याने व विचारानेच झालेला आहे. असे मत संस्थेचे चेअरमन बालेचाँद जमादार यांनी शाहू जयंती निमित्त व्यक्त केले. ते हेरले येथील चंद्रप्रभा विकास सेवा सोसायटीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते.
   यावेळी संस्थेचे संचालक कुमार इंगळे, सुरेश पाटील, रामचंद्र निंबाळकर, जगदीश गडकरी, विठ्ठल शिंदे, सिंकदर खतीब, राजू खतीब, सुरेश चौगुले, सचिव संदीप कोळी आदी मान्यवरांसह सभासद उपस्थित होते.
        फोटो 
हेरले: चंद्रप्रभा विकास सेवा सोसायटीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये चेअरमन बालेचाँद जमादार यांचेसह संचालक.

Tuesday, 25 June 2024

कामधेनू दुध संस्थेच्या चेअरमनपदी रावसाहेब चौगुले तर व्हा. चेअरमनपदी पुजा चौगले यांची निवड

हेरले ( प्रतिनिधी ) हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील कामधेनू सह . दुध व्याव . संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत जयशिवराय आघाडीने सर्व १३ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन .पी . दवडते यांनी काम पाहिले .
              यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक होऊन रावसाहेब चौगुले यांची चेअरमनपदी तर पुजा चौगले यांची व्हा . चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी श्रीकांत सावंत , ॲड विजयकुमार चौगुले, सुनिल खारेपाटणे , मधुकर आकिवाटे , अविनाश पाटील , सतिश वाकरेकर , बबनराव चौगले , स्वप्नील चौगुले , यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
              यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी एन.पी. दवडते यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मंडळ  अमोल झांबरे, अनिल सावंत , प्रकाश चौगुले, भिमराव चौगुले , दगडू कदम , धोंडिराम काकडे, अमिरहमजा हजारी , विनोद शेटे, दत्तात्रय कांबळे , शिवाजी भेंडेकर , जयश्री चौगुले ,  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . आभार संस्थेचे सचिव रमेश लोंढे यांनी मानले .
.

Thursday, 20 June 2024

नवीन संच मान्यतेला विरोध करण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाचा ६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा.


कोल्हापूर / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दि. १५ मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शाळा संच मान्यता आदेशास तिव्र विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापुर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने शनिवार दि. ६ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आज शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांनी आयोजित केलेल्या सभेत घेण्यात आला. ही सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्या भवन येथील कार्यालयात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
            शाळा संच मान्यतेचा नूतन आदेश अत्यंत अन्यायकारक असून शिक्षण क्षेत्र उध्वस्त करणारा आहे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी केले. ते म्हणाले, सदरच्या चुकीच्या आदेशामुळे असंख्य मुख्याध्यापक व शिक्षकांची पदे रद्द होणार आहेत. अनेक शाळांना विशेष शिक्षक मिळाणार नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे. मुख्याध्यापक हे प्रशासकिय पद असल्याने शाळा तिथे मुख्याध्यापक हे पद असलेच पाहिजे. अन्यथा शाळेचे संपूर्ण प्रशासन कोलमडून पडेल.
            व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड व मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहूल पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर सेवक यांनी प्रचंड संख्येनी या मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्र शासनास हा आदेश रद्द करण्यास भाग पाडूया असे आवाहन केले.
        या सभेत शिक्षक नेते दादासाहेब लाड, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, सुधाकर सावंत, सुरेश संकपाळ, भाग्यश्री राणे, व्ही. जी. पोवार, राजेंद्र सुर्यवंशी, बाबा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
या सभेस प्रा. सी. एम. गायकवाड,सुधाकर निर्मळे,रवींद्र मोरे, श्रीकांत पाटील, सागर चुडाप्पा, एस. के. पाटील, विष्णू पाटील, काकासाहेब भोकरे,राजेंद्र कोरे, संतोष आयरे, उदय पाटील, प्रताप देशमुख,एम. जी. पाटील, दीपक पाटील आदीसह  कोल्हापूर जिल्हयातील माध्यमिक शाळांचे  मुख्याध्यापक व व्यासपीठाचे सर्व सदस्य उपस्थित होते.स्वागत व प्रास्तावीक मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील यांनी केले. उपाध्यक्ष मिलींद पांगीरेकर यांनी आभार मानले.
     फोटो 
मुख्याध्यापक संघाच्या विद्या भवन येथील कार्यालयात सभेत मार्गदर्शन करतांना  शिक्षक आमदार जयंत आसगावकर शेजारी एस. डी. लाड, दादासाहेब लाड, राहूल पवार, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, बाबा पाटील आदीसह अन्य मान्यवर.

वडगाव विद्यालयात एस एस सी परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थांचा सत्कार !

हेरले / प्रतिनिधी

अमृत महोत्सवी वडगाव  विद्यालय वडगावमध्ये  एस एस सी परीक्षा मार्च २०२४ मध्ये नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या  प्रथम क्रमांक - कु. चव्हाण आर्या सुशांत-९७.८० टक्के,गणित १००पैकी १०० गुण ( तिनही केंद्रात प्रथम),द्वितीय क्रमांक - चव्हाण स्वयमसिंह सागर - ९५. ४० टक्के( गणित १००पैकी १०० गुण),तृतीय क्रमांक - सनदी सुजल दयानंद - ९०.६० टक्के,कु.पाटील दर्शनी भारत-९०.६० टक्के या विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर यांच्या अमृतहस्ते करण्यात आला. त्यांच्या समवेत उपमुख्याध्यापक  सुधाकर निर्मळे, पर्यवेक्षिका सौ आर.आर. पाटील, कौन्सिल सदस्य  ए. ए. पन्हाळकर,  तंत्र विभागप्रमुख  ए. एस. आंबी, परीक्षा विभागप्रमुख डी. ए.शेळके, संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे ,आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
   शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई , उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत , चेअरमन मंजिरी देसाई मोरे, युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई  आदी मान्यवरांचे यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन लाभले. तसेच १०वी ला शिकविणाऱ्या वर्ग शिक्षक व विषय शिक्षकांचे बहूमोल मागदर्शन लाभले.
    फोटो 
वडगाव विद्यालयात एस.एस. सी. परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थांचा सत्कार करतांना विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर त्यांच्या समवेत उपमुख्याध्यापक  सुधाकर निर्मळे, पर्यवेक्षिका सौ आर.आर. पाटील, कौन्सिल सदस्य  ए. ए. पन्हाळकर,  तंत्र विभागप्रमुख  ए. एस. आंबी, परीक्षा विभागप्रमुख डी. ए.शेळके, संस्थेचे मुख्य लिपिक के. बी. वाघमोडे आदी मान्यवर

Monday, 17 June 2024

मौजे वडगाव कामधेनू दुध संस्थेत जयशिवराय पॅनेल विजयी - संयुक्त आघाडीचा धुव्वा उडवित सर्व १३ जागा जिंकून सत्तांतर

हेरले /प्रतिनिधी  
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील कामधेनू दुध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली . यामध्ये जयशिवराय पॅनेलने संयुक्त आघाडीचा धुव्वा उडवित सर्व १३ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले . 
    निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.पी. दवडते व त्यांचे सहकारी यांनी काम पाहिले . जयशिवराय पॅनेल मधील विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते पुढील प्रमाणे सर्वसाधारण उमेदवार रावसाहेब चौगुले ( २८९ ) दगडू कदम ( २५९ ) धोंडिराम काकडे ( २५० ) प्रकाश चौगुले ( २५५ ) भिमराव चौगुले ( २५२ ) अमोल झांबरे ( २६४ ) अनिल सावंत ( २६० ) अमिरहमजा हजारी ( २५४ ) स्त्री राखीव जयश्री चौगुले ( २७६ ) पुजा चौगले ( २६२ ) इतर मागासवर्ग विनोद शेटे ( २९१ ) अनु जाती दत्तात्रय कांबळे ( ३१८ ) भटक्या वियुक्त जाती शिवाजी भेंडेकर (२७७ ) अशी मते घेऊन १३ उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ५० ते ६० मतांनी विजय संपादन केला .
             या आघाडीचे नेतृत्व श्रीकांत सावंत , ॲड विजय चौगुले , सतिश वाकरेकर, सुनिल खारेपाटणे , अविनाश पाटील , स्वप्नील चौगुले , आदींनी केले .
          या संस्थेची १३ जागेसाठी निवडणूक झाली . मतदान १६ जून रविवारी ८ ते ३ या कालावधीत झाले . याच दिवशी तात्काळ मतमोजणी करूण सायंकाळी निकाल घोषित झाल्यानंतर विजयी जयशिवराय पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत व फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला .


भटक्या विमुक्त जागेवर हातकणंगले काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य डॉ . विजयकुमार गोरड यांचा शिवाजी भेंडेकर या नवख्या 
मेंढपाळाने ५२ मतांनी धक्कादायक पराभव केला .
डॉ विजयकुमार गोरड यांना २२५ मते तर शिवाजी भेंडेकर यांना २७७ मते पडली .

Saturday, 15 June 2024

पुस्तके ही खरी ज्ञानाची केंद्रे आहेत. - श्री चंद्रकांत पाटील.


*मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र .11 येथे पाहिलीचा प्रवेशोत्सव जल्लोषात आणि आनंदमय वातावरणात साजरा*
मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र .11 कसबा बावडा , कोल्हापूर येथे शनिवार दि . १५ जून रोजी सन २२०२४- २०२५शैक्षणिक वर्षाची सुरवात आणि प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला .
शाळा आणि शाळा परिसर रंगबेरंगी फुगे 🎈, रांगोळी ⚛️ , फुले 💐आणि तोरण☘️ यांनी सजवलेला होता . इ . १ ली च्या नूतन प्रवेश घेणाऱ्या नवगतांचे स्वागत प्रमुख पाहुणे चंद्रकांत पाटील, राजेंद्र आप्पूगडे, डॉ अजितकुमार पाटील,उत्तम कुंभार,दुडेय्या गनिकोप्पा, सुशिल जाधव यांचे हस्ते गुलाब🌹 पुष्प व  चॉकलेट 🍭 देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. 
याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी सेवानिवृत्त श्री चंद्रकांत पाटील यांचा सपत्नीक शाल,श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला.

या उत्सवाच्या वातावरणात निरागस चेहर्‍यांचे हसू आणि निर्भय छटा खुलून आल्या आणि मोठ्या आनंदाने मुले शाळेत रंगून आणि दगूंन गेली .
तसेच शाळेच्या १ ल्या दिवशी  सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तक ही वाटप करण्यात आले .
सदर कार्यक्रमास शाळा व्यव स्थापन समिती अध्यक्ष  रमेश सुतार,उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, मुख्या . श्री . डॉ. अजितकुमार भिमराव पाटील ,दिव्यांग समावेशित शिक्षण चे साधनव्यक्ती राजेंद्र आपुगडे साहेब, चंद्रकांत पाटील श्री.उत्तम कुंभार , सुशील जाधव, श्री उत्तम पाटील, मिनाज मुल्ला, तांबोळी मॅडम ,विद्या पाटील, तमेजा  मुजावर,बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेविका सावित्री काळे,सेवक हेमंतकुमार पाटोळे 1 ते 7 चे सर्व  विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तम कुंभार यांनी केले, प्रास्ताविक डॉ.अजितकुमार पाटील यांनी केले,राजेंद्र आपुगडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, उत्तम पाटील यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.अशा उत्साहाने भारलेल्या आणि मंगलमय पवित्र वातावरणात आजचा प्रवेशोत्सव संपन्न झाला.

आजची बालके ही उद्याचे भविष्य आहे - डॉ. अजितकुमार पाटील,कोल्हापूर.

'बच्चे मनके सच्चे, सबकी आँखके है ये तारे। ये वो नन्हे फूल है, जो भगवान को लगते प्यारे ।।'

मनाने निर्मळ असणारी ही बालके, खरेच भारतमातेच्या भविष्यातील उज्ज्वल असे तारे आहेत.निसर्गाच्या शुद्ध निर्झरासारखी शुद्ब मुले ही खरी राष्ट्राची संपत्ती आहे. सृष्टीचा नियमंच आहे, जुनी पाने पडून-गळून जातात, त्याजागी नवीन पालवी फुटते, ती झाडाला फुलवते. बहरते, सर्वांना फळे-फुले देते. अगदी तशीच कथा या आपल्या छोट्या-छोट्या बालकांची आहे. मानवी जात, समाजाचे अस्तित्व, गाव, देश आणि सारे जग हे याच जीवनचक्रातून फिरत असते.
परंतु आजच्या बदलत्या काळानुसार आई-वडील दोघेही नोकरीसाठी बाहेर पडतात. घरात आता आजी-आजोबाही मिळणे अशक्य असते. वाढत्या महागाईने अर्थार्जनासाठी. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आई-वडील नोकरी करतात. बालकांना मात्र उजाडल्यापासून पाळणाघरात भरती व्हावे लागते. वाढती लोकसंख्या आणि विभक्त कुटुंबपद्धती यामुळे 'हम दो हमारा एक' या संकल्पनेकडे आता कुटुंबे झुकत चालली आहेत. पाळणाघरातही चांगल्याप्रकारे बालकाचे सामाजीकरण होईलच असे नाही. जसजसा बाळ मोठा होतो. तसतसे त्याचे सोबती दोस्त वाढतात. 'शाळा-शिक्षण-अभ्यास-विविध प्रकारचे क्लास' यामुळे ती मुलेही पूर्णपणे व्यस्त राहतात. आपल्या भावना, आपले विचार कोणापुढे व्यक्त करण्याची ना सोय असते, ना सवड, भीतीमुळे त्यांचे विचार दबले जातात. आई-बाबांशी बोलण्यासाठीही फोनचा आधार घ्यावा लागतो. अर्थातच हे अल्लड वय आणि लहान कोवळ्या वयात समोर असणारी असंख्य प्रलोभने टीव्ही, जाहिराती, संगीत, गाणी, खेळ, व्हिडिओ आणि आतातर इंटरनेटवरील चिटचॅटींग. नकळत ही मुले वाहवत जातात. आईच्या अंगाई गीताच्या जागी, कसली-बसली गाणी-कर्कश आवाज त्यांना ऐकावे लागतात. समोर जेवण-खाण तर ते काढून ठेवलेले किंवा कधी कधी बेकरीतील पदार्थ यावर भागवावे लागते. ना प्रेमाचा हात, ना नात्यागोत्यांची ओळख, ना कुटुंब, ना घर, ना दार, ना गाव आणि ना देश. कशाचाच परिचय त्यांना झालेला नसतो.कशाबद्दलचे प्रेम त्यांच्यात निर्माण झालेले नसते.
तसे पाहता काळ हा नित्य परिवर्तनशील आहे. तसेच या मुलांना योग्य दिशा दाखविण्यासाठी ही आजकाल विविध संस्था कार्यरत आहेत. शाळाशाळांतून मौलिक शिक्षणाचे पाठ, व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग, क्रीडांगणे,संस्कार शिबिरे कला-छंद वर्ग, प्रयोगशाळा इत्यादी असतातच त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना घेऊ देणे... त्यासाठी आई-वडील अन् शिक्षक यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यकच आहे. शालेय कार्यक्रमातून दिनविशेष, थोर नेत्यांच्या जयंत्या, राष्ट्रीय धार्मिक सण, सहली, स्पर्धा, परीक्षा असेही नानाप्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यांचा परिचय, त्यांची ओढ या नवीन मुलांना लावून देणे अतिशय महत्त्वाचे आहे.

आजचे नागरिक तयार करण्यासाठी या बालकांना योग्य तो आकार देणे, त्यांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक वाढ व विकास हा उचित मार्गाने घडविणे हे आत्ताच्या मोठ्या लोकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. ही निरागस, निष्पाप मुले खरोखरीच 'मातीचा गोळा' असतात. त्याला योग्य आकार आपण दिला पाहिजे. अब्राहम लिंकन यांनीही बालकांवर योग्य संस्कार झाले पाहिजेत, यावर मार्गदर्शन केले आहे. संस्कारक्षम वयातच पालकांनी ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठीच नव्हे तर त्याचबरोबर देशाच्या भविष्याचा विचार करून आपल्या मुलांना आजी-आजोबांचा लळा, प्रेम हे दिले पाहिजे. त्यातूनच एकमेकांबद्दल स्नेह निर्माण होत असतो.
आजूबाजूची ही प्रलोभने नको ते संस्कार या कोवळ्या मनावर घडवीत राहतात, त्या जाहिराती.बातम्या-चित्रपट यांचा बरोबर उलट परिणाम या मुलांवर होतो आणि ही मुले आळशी-चैनी-चंगळवादी बनण्याची शक्यता वाढते. तेव्हा त्यापासून पालक आणि शिक्षक, त्याचबरोबर समाजही मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल तरच भविष्यकाळ आपला व त्यांचा उज्ज्वल राहील. काही वेळा मुले नाहक व्यसनात गुंतत जातात, निराश होतात. अशावेळी जर त्यांचे योग्य समुपदेशन झाले नाही, तर मुले हातची जातात. त्यांना सुधारणे अवघड होऊन बसते.
सुदृढ, सक्षम, निरोगी, व्यसनमुक्त, बुद्धिमान बालके ही त्या देशाची बलस्थाने असतात. प्रेम, श्रद्धा, कर्तव्य, चिकाटी,. कष्ट इ. अनेक गुणांचा संचय त्यांच्यात व्हावा म्हणून पालक, शिक्षक, समाज या सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे 'पराभव' हसत हसत स्वीकारण्याची आणि 'विजय' संयमाने साजरा करण्याची जाण त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. त्यातूनच निश्चितपणे देशाचे भवितव्य हे उज्ज्वल होईल यात शंका नाही.

"Education is not merely acquiring knowledge, gathering & correcting facts, It is to see the significance of life as a whole But whole cannot be approached through part which is what government organised religious & authorization parties are attempting to do.

आकाशवाणी, साहित्य, वृत्तपत्रे, सिनेमा, दूरदर्शन ही प्रसारमाध्यमे मूल्यशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे करू शकतील आज या साधनांचा समाजावर, समाजातील व्यक्तींच्या मनावर जबरदस्त प्रभाव पडत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यातही ही साधने हातभार लावत आहेत. 

मानवी मनावर संस्कार करण्याचे सामर्थ्य साहित्यामध्ये नक्कीच आहे. मुलांच्या ज्ञानात भर टाकून त्यांना बहुश्रुत करणे, त्यांच्या विचारशक्तीचा व बुद्धीचा विकास करणे हे कार्य साहित्य उत्तमरीतीने करू शकते. उदा. रामायण, महाभारत, भगवद्‌गीता इ. वर्तमानपत्र ही जनतेची दैनंदिन गरज होऊन बसली आहे आणि त्यांची वाढती आवश्यकता हे सामाजिक प्रगतीचे लक्षण आहे. पण काही उत्तम, दर्जेदार वर्तमानपत्रे सोडली तर त्यांचा ओढा लोकमत जागृत करण्यापेक्षा ते भडकवण्याकडेच अधिक असतो, त्याच्या अतिरंजितपणावरच अधिक भर दिला जातो, दोन्ही बाजूंचा विचार करून सत्य प्रदर्शित करण्याऐवजी एकांगी स्वरूपात विचार करून एकतर त्याची अतिरिक्त स्तुती किंवा निंदा केली जाते. पक्षीय वृत्तपत्रे तर याहून एक पाऊल पुढे. आपापल्या मतांच्या प्रचारापेक्षा विरुद्ध पक्षाच्या पुढाऱ्यांच्या कुरघोडी करण्यातच त्यांना मौज वाटते. अशीही वर्तमानपत्रे मुलेही वाचतात, त्यामुळे त्यांच्या अपरिपक्व मनावर अनिष्ट परिणाम होतो. वृत्तपत्रांनी आपली सामाजिक व नैतिक जबाबदारी ओळखून वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या माहितीबाबत थोडा संयम आणि विवेक ठेवला तर दुष्परिणाम टाळला जाऊ शकतो.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सगळ्यात जास्त आकर्षण असते ते सिनेमाचे. नट-नट्यांच्या स्टाईलचा परिणाम
घरोघरी समाजात सर्वत्र पाहायला मिळतो कॉलेजच्या नावावर घरातून निघून कॉलेजात न जाता सिनेमा पाहायला जाणाऱ्या
विद्यार्थ्यांची संख्या सारखी वाढत आहे. अर्थात यात विद्यार्थ्यांचा दोष आहे असे नाही जागोजागी, कानावर पडणारे अखंड सिनेसंगीत, त्याचप्रमाणे बहुसंख्य चित्रपटांमधून खून मारामाऱ्या, बीभत्स प्रसंग, उत्तान' नृत्य, शृंगारिक प्रसंग यांचा भरणा दिसतो. अशाप्रकारचे परिणाम टाळता येऊ शकतात. सिनेमांचे सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांचा शिक्षणासाठी वापर करून घेणे फार आवश्यक आहे.
दूरदर्शन हे देखील तितकेच प्रभावीप्रसार माध्यम आहे. आकाशवाणीवर फक्त आवाज ऐकता येतो, तर चित्रवाणीवर आवाजाबरोबर दृश्यही पाहता येते. कोणत्याही प्रसंगाचे प्रत्यक्ष दृश्य पाहिल्याने त्यातून जो अनुभव मिळतो जे ज्ञान मिळते.

Sunday, 9 June 2024

नागाव येथील शिवभक्त युवकाचा अन्य सहा साथीदारासमवेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 500 किलोमीटर सायकलने प्रवास


हेरले / प्रतिनिधी

नागाव येथील सुनिल ऐतवडे या कट्टर शिवभक्त युवकाने 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्याच्या अन्य 6 या साथीदारासोबत कोल्हापूर ते रायगड असा 500 किलोमीटरचा प्रवास सायकलने पार पाडला. या उपक्रमात भिमराव सुतार-शिरोली पुलाची, राम कारंडे व समर कारंडे - कोल्हापूर,जयदीप पाटील -पाचगाव ,सिद्धार्थ केसरकर- गारगोटी दिपक सावेकर- कोल्हापूर यांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे या उपक्रमात समर कारंडे ह्या 13 वर्षाच्या लहान मुलाने  तसेच 63 वर्षाच्या वयोवृद्ध भीमराव सुतार व दीपक सावेकर यांनीही रायगड पर्यंत अंतर सायकलने पार पाडले. हा उपक्रम फिटनेस आयकॉन अक्षय कुमार फॅन्स क्लब कोल्हापूर यांच्या द्वारे राबवण्यात आला होता. या उपक्रमाला माजी खासदार संभाजी राजे यांचे मोठे सहकार्य लाभले. या सायकल प्रवासाला मंगळवार दिनांक 4 जून रोजी छत्रपती शिवाजी चौक कोल्हापूर येथे अभिवादन करून प्रवासाला सुरुवात झाली. रायगड येथे बुधवार दिनांक 5 जून रोजी सायंकाळी सहा वाजता हे सर्वजण रायगडच्या पायथ्याला पोहोचले.तसेच संपूर्ण रायगड च्या पायऱ्या चालत चढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. वाटेत त्यांना विविध लोकांचे प्रोत्साहन,सहकार्य लाभले.सायकलवरून येऊन या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम हे फक्त कोल्हापूर करच करू शकतात अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. अशा या शिवभक्त मावळ्यांना सर्वांच्याकडून या उपक्रमाबद्दल कौतुकाची थाप मिळत आहे.