हेरले (प्रतिनिधी ) हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील ओंकार नलवडे याची कोल्हापूर पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून १५० पैकी १४२ गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला . त्यांने जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. एका सामान्य कुटूंबातील ओंकारने आपले पोलिस खात्यात करिअर करायचे म्हणून अतिशय जिद्दीने प्रयत्न करित होता. त्यामध्ये त्याला यश मिळाले . मौजे वडगाव येथील तो एका सामान्य कुटूंबातील मुलगा असून त्याचे वडील जनावरे बाळगून एम .आय .डी . सी . येथील एका खाजगी कंपनीत काम करतात तर आई गृहीणी म्हणून घर सांभाळतात . त्याला पोलिस भरती होण्यासाठी आई वडिलाचे मोठे पाठबळ मिळाले त्याच्या या यशाबद्दल गावात हालगी वाजवून स्वागत करण्यात आले तर गावातील विविध सेवा संस्थाच्या वतीने या निवडी बद्दल त्याचा सत्कार करण्यात आला . तसेच गावातील मान्यवरांच्या कडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment