Saturday, 31 August 2024

ओंकार वडर, समर्थ पाटील यांची कॅरम स्पर्धेत बाजी; मनपास्तर शालेय कॅरम स्पर्धा



कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने विवेकानंद महाविद्यालयात पार पडलेल्या मनपास्तर शासकीय शालेय कॅरम स्पर्धेत मुलांच्या गटात ओंकार वडर, समर्थ पाटील, पृथ्वीराज घोडे; तर मुलींमध्ये श्रेया मातीवडकर, ईश्वरी पाटील, धनश्री गोरे यांनी १४, १७, १९ गटांत प्रथम क्रमांक पटकावला.
गणित विभागप्रमुख प्रा. एस. पी. थोरात व प्रा. शिल्पा भोसले यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

१४ वर्षे मुलांच्या गटात ओमकार वडर (माझी शाळा विद्यालय) याने प्रथम, विशाल कळंत्रेने (न्यू हायस्कूल) द्वितीय व आरुष पवारने (माईसाहेब बावडेकर अकॅडमी) तृतीय क्रमांक मिळवला. याच गटात मुलींमध्ये श्रेया मातीवडकरने प्रथम, समीक्षा साजनीकरने द्वितीय (नानासाहेब गद्रे हायस्कूल ), व आदिती शिंदे (तवनापा पाटणे हायस्कूल ) तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे मुलींमध्ये ईश्वरी पाटील प्रथम (विमला गोइंका इंग्लिश स्कूल), पूर्वा परीटने द्वितीय (राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, जुना बुधवार) व निकत सय्यदने (आदर्श प्रशाला) तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे मुलांमध्ये समर्थ पाटीलने (सेंट झेव्हिअर्स हायस्कूल) प्रथम क्रमांक प्राप्त केला. वंश वाझेने द्वितीय (सेवंथ डे स्कूल) व ऋषिकेश कुंभारने (विवेकानंद कॉलेज) तृतीय क्रमांक मिळवला. १९ वर्षे मुलांमध्ये पृथ्वीराज घोडेने प्रथम (विवेकानंद कॉलेज), संस्कार पाटीलने द्वितीय व ऋषिकेश चौगुलेने तृतीय (विवेकानंद कॉलेज) क्रमांक मिळवला. याच गटात मुलींमध्ये धनश्री गोरेने प्रथम (विवेकानंद कॉलेज), समृद्धी बरालेने द्वितीय (राजर्षी छत्रपती शाहू जुनिअर कॉलेज जुना बुधवार) व प्राची चौगुले (विवेकानंद कॉलेज ) तृतीय क्रमांक मिळवला.
फोटो : २८०८२०२४-कोल-कॅरम स्पर्धा

फोटो ओळी : मनपास्तर कॅरम स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांसोबत सचिन पांडव, किरण खटावकर, संतोष कुंडले, ॲलन फर्नांडिस उपस्थित होते.

Wednesday, 28 August 2024

नदीच्या पुराच्या तीन फूट पाण्यात उतरून उच्चदाब वाहिनी जोडली - कनिष्ट अभियंता संदिप कांबळे यांचे कार्य स्तूत्य.


      हेरले /प्रतिनिधी
हेरले गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या 11 के.व्ही. हेरले गावठाण वाहिनीचा कंडक्टर तुटून पाणी पुरवठा बंद पडलेला होता.3 फूट पाण्यामध्ये  महावितरणच्या हेरले शाखेतील कनिष्ट अभियंता संदिप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करून तुटलेली उच्चदाब वहिनी जोडून गाव पाणी पुरवठा चालू केला.
   उच्चदाब वाहिनी तूटल्यामुळे हेरले गावातील पाणीपुरवठा बंद होता. ४ दिवस होत असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत भरपूर वाढ झालेली आहे. तसेच कंडक्टर तुटून पडलेल्या ठिकाणी अडीच ते तीन फूट नदीचे पाणी असल्यामुळे वायर ओढण्यास अडचण निर्माण होत होती. सदर ठिकाणी 3 फूट पाण्यामध्ये  महावितरणच्या हेरले शाखेतील कनिष्ट अभियंता संदिप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय भोसले, संतोष जाधव,अशोक काळे, विशाल हराळे, प्रदीप कांबळे या कर्मचाऱ्यांनी तुटलेली उच्चदाब वहिनी जोडून गाव पाणी पुरवठा चालू केला. या त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल गावातून त्यांचे
कौतुक होत आहे.
    फोटो 
हेरले: कनिष्ट अभियंता संदिप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नदीच्या तीन फूट पाण्यात महावितरण कर्मचारी तुटलेली उच्चदाब वहिनी जोडतांना.

Monday, 26 August 2024

छत्रपती शिवाजी विकास संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न.



हेरले /प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी विकास संस्थेचे वाटचाल सहकारातून समृद्धीकडे होत आहे भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक योजना सुरू करणार असून यातून संस्था जिल्हा पातळीवर नाव रुपास येणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी केले.
    ते  श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा  संस्थेची २९ व्या  वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
  

यावेळी  संस्थेचे सचिव नंदकुमार माने  यांनी अहवाल वाचन केले तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अशोक मुंडे होते .मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली. 


       चेअरमन अशोक मुंडे म्हणाले,गेली काही वर्षांमध्ये संस्थेमध्ये अत्यंत काटकसरीने कारभार केला असल्याने ठेवी  व कर्जामध्ये वाढ झाली असल्यामुळे संस्थेस ७ कोटी पर्यन्त कर्ज वाटप तर  ४ कोटी पर्यंतच्या ठेवी संस्थेकडे असून यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा भागिल्या जात आहेत.भविष्यात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा अन्य सुविधा तसेच अन्न उपक्रम राबविण्यात जाणार आहेत.तसेच संस्थेच्या वतीने लेक लाडकी योजना सुरू करत असून यामध्ये ज्या सभासदाला पहिली मुलगी होईल त्या मुलीच्या नावाने संस्थेच्या वतीने ५००० रुपये अठरा वर्षाकरिता ठेवले जाणार असून ते त्या मुलीच्या १८ व्या वर्षी परत दिले जाणार आहे. संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळ व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे.
   संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

           या प्रसंगी  सरपंच राहुल शेटे, उपसरपंच नीलोफर खतीब,स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणीस मुनिर जमादार,राजगोंड पाटील सर, यांनी मनोगते व्यक्त केली.
    या सभेस उद्योगपती सरदार आवळे,राजगोंड पाटील , सरपंच राहुल शेटे,उपसरपंच नीलोफर खतीब,ग्रा. सदस्य हीरालाल कुरणे, शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगुले व्हा. चेअरमन लक्ष्मण निंबाळकर, व्हा चेअरमन कपिल भोसले, उदय चौगुले, कृष्णात खांबे, शशिकांत पाटील, सुनील खोचगे, नितीन चौगुले, संजय पाटील, राजेंद्र कदम, स्वप्नील कोळेकर,  शांतादेवी कोळेकर, सुजाता पाटील,मुनीर जमादार,सुकुमार कोळेकर, रावसाहेब चौगुले, पांडू चौगुले, संजय परमाज,आदी मान्यवरांसह  सभासद, संस्थेच कर्मचारी, हितचिंतक मोठया संख्येंनी उपस्थित होते  आभार व्हा. चेअरमन कपिल भोसले  यांनी मानले.


फोटो 
-हेरलेत छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेत मार्गदर्शन करत असताना माजी सभापती राजेश पाटील

Wednesday, 21 August 2024

मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्रमांक 11 या शाळेचा 153 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 राजर्षी शाहू विद्या मंदिरात वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त  साधना पाटील मॅडम , प्राथमिक शिक्षण समिती शैक्षणिक  पर्यवेक्षक श्री बाळासाहेब कांबळे ,केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर स्कॉलरशिप परीक्षा, एम एस टी एस ,समृद्धी परीक्षा या परीक्षेत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय व शहर विभागात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा माननीय उपायुक्त साधना पाटील मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे व विजय माळी,रणजित नावडे सर यांच्या हस्ते भाषा गणित इंग्रजी कला अशा विविध विषयांच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. उपायुक्त मॅडम यांनी मुलांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व मुलांच्या यशाचे कौतुक केले. पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पाटील मॅडम यांनी केले व आभार ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सर यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी डॉ अजितकुमार पाटील उत्तम कुंभार उत्तम पाटील मिनाज मुल्ला ,आसमा तांबोळी तमेजा मुजावर, विद्या पाटील, दिपाली यादव, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, बालवाडी मुख्याध्यापिका, कल्पना पाटील ,सेविका सावित्री काळे ,सेवक हेमंतकुमार पाटोळे,भारत स्काऊट गाईड, माझी वसुंधरा विद्यार्थी व आदि उपस्थित होते.

बदलापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करणेबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन

कोल्हापूर / प्रतिनिधी

बदलापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करणेबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारीअमोल येडगे  यांना लेखी निवेदन  पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ आमदार जयंत आसगावकर यांनी दिले.
     लेखी निवेदनातील आशय असा की,
बदलापूर (ठाणे) येथील आदर्श विद्या मंदिरात दोन मुलींवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. बदलापूर येथे घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. हा गंभीर गुन्हा असतानाही तो दाखल करण्यास उशीर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचाही जाहीर निषेध करतो.

  विधान परिषद सदस्य या नात्याने मी आपणाकडे मागणी करतो की, अशा घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक शाळेत सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा कर्मचारी नेमण्यात यावेत तसेच प्रत्येक वर्गात, स्टाफरूम आणि मैदान परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. मुलींच्या सुरक्षितेसाठी राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी विशाखा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला; परंतु त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी झालेली नाही. प्राथमिक स्तरावर सखी सावित्री व माध्यमिकसाठी विशाखा समितीचे गठन करून त्यांच्या नियमित बैठका घेण्यात याव्यात. बैठकीचा अहवाल केंद्रस्तर समिती समोर दर महिन्यास सादर करणे आवश्यक आहे. त्यातून मुलींच्या अडचणी समजण्यास मदत होणार आहे.

  आणखी एका गोष्टीकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो, राज्य शासन शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करणार आहे. या भरतीला मी वेळोवेळी विरोध करत आलो असून ती कशी चुकीची आहे, हेही मी शासनाला पत्राद्वारे कळवली आहे. या कंत्राटी कर्मचारी भरतीमुळे शाळेतील महत्त्वाचे दस्तावेज धोक्यात येणार आहेत. या पलीकडची गंभीर बाब म्हणजे आमच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे. या साऱ्या बाबींचा विचार करता शासनाने ही कंत्राटी भरती रद्द करून ती कायमस्वरूपी करावी, जेणेकरून अशा घटनांना चाप बसेल.तरी, राज्य शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला जबर शिक्षा देण्यात यावी तसेच शालेय मुलींवरील अत्याचाराच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा.

    राज्य निवडणूक आयोग, मुंबई व्दारा  जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा यांना माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बी.एल.ओ. (B.L.O) आदेशाबाबत शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन सदर कर्मचा-यांचे बी.एल.ओ. आदेश रद्द व्हावेत व येथून पुढे बी. एल. ओ. सारखी अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने केली आहे.

 लेखी निवेदनातील आशय असा की, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना बी.एल.ओ. नियुक्ती आदेश संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत लागू करण्यात आलेले आहेत. संबंधित आदेशात फौजदारी कार्यवाही करणेबाबत कळविलेने संबंधित आदेश संबधित कर्मचा-यांना मुख्याध्यापकांनी लागू केले आहेत. तसेच सदर कार्यालयाकडून फौजदारी कार्यवाहीची भिती दाखवून संबंधित कर्मचा-यांना बी.एल.ओ. कामावर हजर होण्याची सक्ती करण्यात येत आहे.

वरील संदर्भिय मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका क्र. १३९११/२०१७ च्या अंतरिम आदेशान्वये मुख्याध्यापक संघाचे सभासद असणा-या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यास बी.एल.ओ.चे आदेश देण्यास स्थगिती देण्यात आली आहे. सदर बाब आणि शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन सदर कर्मचा-यांचे बी.एल.ओ. आदेश रद्द व्हावेत व येथून पुढे बी. एल. ओ. सारखी अशैक्षणिक कामे देऊ नयेत ही विनंती.

आमदार जयंत आसगावकर, अध्यक्ष एस.डी.लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन राहुल पवार, सचिव आर.वाय.पाटील, सुधाकर निर्मळे,उदय पाटील,के.के.पाटील,संदीप पाटील,भरत रसाळे,
राजेश वरक,राजेंद्र कोरे,राजाराम वरुटे
दीपक पाटील आदी शैक्षणिक व्यासपीठाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
   फोटो 
कोल्हापूरः जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना लेखी निवेदन देतांनाआमदार जयंत आसगावकर, अध्यक्ष एस.डी.लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन राहुल पवार, सचिव आर.वाय.पाटील आदिसह अन्य मान्यवर.

Tuesday, 13 August 2024

पेन्शन क्रांती महामोर्चात शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदिनीशी उतरणार.


    कोल्हापूर / प्रतिनिधी
सर्व शासकिय व निमशासकिय कर्मचारी संघटनांच्या समन्वयाने व सहभागाने शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या पेन्शन क्रांती महामोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदिनीशी उतरणार असल्याचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याध्यापक संघाच्या विद्या भवन सभागृहामध्ये शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ संयुक्त बैठकीमध्ये सांगितले. या सभेच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते.
       मागील दहा वर्षात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाद्वारे चालू असलेला लढा सर्व कर्मचारी संघटनांच्या सहकार्याने आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशा निर्णायक वळणावर १९८२ ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी मिळविण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जोरदार आक्रोश व्यक्त करण्यासाठी शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी पेन्शन क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. इतर राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होत असेल तर ती महाराष्ट्रात सुद्धा लागू झाली पाहिजे. या मागणीसाठी जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी या महामोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवारी १७ रोजी  १२ वाजता टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मोर्चा निघेल.
     या प्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाड, चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे, एम. जी. पाटील, आर. डी. पाटील, शिवाजीराव भोसले, विनोद पाटील, मनोहर जाधव, मारुती फाळके,मंगेश धनवडे, संतोष गायकवाड, सुदेश जाधव, अमर वरुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
  फोटो 
कोल्हापूर: शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत बोलतांना शिक्षक  आमदार जयंत आसगावकर, शेजारी दादासाहेब लाड, एस.डी. लाड, राहूल पवार, आर. वाय. पाटील, खंडेराव जगदाळे आदी मान्यवर

Sunday, 11 August 2024

सेवानिवृत्तांना सभासद करण्याचा ठरावकोजिमाशि वार्षिक सभा


हेरले /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या ( कोजिमाशिच्या ) सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अ वर्ग सभासद करण्याचा ठराव ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने करण्यात आला. तसेच सभासद कर्ज मर्यादा ४२ वरून ४७ लाख रुपये व दोन लाख रुपये तातडीच्या कर्जास १० ऐवजी ९ टक्के व्याजदर करण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष मदन निकम यांनी केली. महासैनिक दरबार हॉल येथे अडीच तास  खेळीमेळीच्या वातावरणात सभा झाली.
सभासदांना १९ टक्के लाभांश देणे, स्टाफिंग पॅटर्नला मंजुरी देणे, मुरगुड शाखा इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामास मंजुरी आदी सभेपुढील विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.
तज्ञ संचालक दादा लाड म्हणाले, सभासदांचे विश्वासास पात्र राहून संस्थेचा कारभार सुरू आहे. त्यामुळे संस्थेने सहाशे कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे.   
 संस्थेला चालू आर्थिक वर्षात ४ कोटी ८७ लाख रुपये नफा झाला आहे. संस्थेने २२८ कोटी २ लाख रुपये गुंतवणूक केली आहे.अहवाल वाचन मुख्य कार्यकारीअधिकारी जयवंत कुरडे यांनी केले. 
 संस्थेने स्वमालकीच्या वास्तुत सर्व शाखा उभ्या कराव्यात अशी मागणी सुहास पाटील यांनी केली. दीपक साठे यांनी संस्थेने ॲप तयार करून सभासदांना घरबसल्या खात्याची माहिती  देण्याची मागणी केली.
विनोद उत्तेकर,शिवाजी नाईक,पवन पाटील ,अशोक मानकर ,अंकुश कांबळे ,अमरसिंह रजपूत आदी सभासदांनी प्रश्न विचारले.
 संचालक उत्तम पाटील, लक्ष्मण डेळेकर ,अनिल चव्हाण , दत्तात्रय घुगरे , राजेंद्र रानमाळे ,प्रकाश कोकाटे ,शरद तावदारे , पांडुरंग हळदकर , दिपक पाटील , श्रीकांत पाटील , सुभाष खामकर , मनोहर पाटील,राजेंद्र पाटील,अविनाश चौगुले,सचिन शिंदे, राजाराम शिंदे , जितेंद्र म्हैशाळ ,ऋतुजा पाटील , शितल हिरेमठ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे  आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी आभार मानले.
 
चौकट 
दिवाळीला तेलाबरोबर तूपही 

सभासदांना दीपावली भेट म्हणून यावर्षी तेलाबरोबर तूपही द्यावे अशी मागणी मुख्याध्यापक जी.एस.पाटील यांनी केली. त्यानुसार सभासदांना दहा किलो  तेलाबरोबर तूपही देण्याचे यावेळी दादा लाड यांनी जाहीर केले.

सभासदांच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे

आजच्या सभेत सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित केले. सभासदांच्या या सर्व प्रश्नांना तज्ञ संचालक दादा लाड व अध्यक्ष  मदन निकम यांनी समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सुमारे अडीच तास ही सभा चालली.

गोड भोजनाचा आस्वाद 
संस्थेने सभास्थळी सभासदांना गोड जिलेबीच्या जेवणाची सोय केली होती.त्याचा आस्वाद सभासदांनी घेतला.यावेळी काही सभासदांनी परिवारासह हजेरी लावली होती.

स्वप्निल कुसाळेचे अभिनंदन
 नेमबाजीत ऑलम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळे याने कास्यपदक मिळविल्याबद्ल त्याच्या अभिनंदनाचा ठराव क्रीडा शिक्षक एस.पी.पाटील यांनी टाळ्यांच्या गजरात मांडण्यात आला.

फोटो
कोल्हापूर:कोजिमाशिच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष मदन निकम ,व्यासपिठावर तज्ञ संचालक दादा लाड, श्रीकांत कदम, जयवंत कुरडे, संचालक मंडळ .

Friday, 2 August 2024

शैक्षणिक उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे - डॉ अजितकुमार पाटील .


प्राथमिक शिक्षण समिती संचालित मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर मध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.कोल्हापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा डॉ राजेंद्र भोईसाहेब, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी श्री आर व्ही कांबळे साहेब,शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी ,बाळासाहेब कांबळे ,उषा सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते.

 कोल्हापूर शहरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले.
 केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये मध्ये आनंददायी शनिवार इंस्पायर अवॉर्ड ,सक्सेस स्टोरी उपक्रम, जीवन शिक्षण अंक, यशोगाथा व इतर विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते चर्चासत्रामध्ये कुमार पाटील, माधवी  सौदलगे, सरदार पाटील मुख्याध्यापक विजय कुरणे इत्यादींनी आपली मते मांडली 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, भावनिक कौशल्य विकसित करणे, ताणतणाव व्यवस्थापन करणे, संभाषण कौशल्य विकसित करणे आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे व विद्यार्थ्यांसी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यास सहकार्य वृत्ती,नेतृत्व गुण अंगी येण्यासाठी त्यास खेळाच्या माध्यमातून कृतिशील  अध्यायनातून आनंददायी शिक्षण देऊन आत्मविश्वास निर्माण करून विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे महत्वाचे आहे. सामाजिक बांधिलकीतून समाजसेवा श्रमदान करणे, पर्यटन, लोकशाहीची मूल्ये ,माहिती तंत्रज्ञान पर्यावरण या शिक्षणातून एक भारताचा आदर्श असा एकविसाव्या  शतकातील आव्हान पेलणारा आदर्श नागरिक घडणार आहे.विद्यार्थी  स्वावलंबी बनवणे हीच खरी पालक व शिक्षक यांची कसरत आहे प्रतिपादन डॉ अजितकुमार पाटील यांनी प्रतिपादन केले.

परिषदेच्या यशस्वीतेसाठी उत्तम कुंभार, आसमा तांबोळी, कमलाकर काटे,बालाजी मुंडे,दीपाली यादव,दिपमाला ओतरी,अनिल सरक,मोहन पाटील,सातप्पा पाटील, शिवशंभू गाटे, विद्या पाटील,तानाजी पाटील,छाया पोवार,व इतर मान्यवर मुख्याध्यापक, शिक्षक मित्र उपस्थित होते.
नवीनच ऑनलाईन पोर्टल शिक्षक भरती होऊन आलेल्या शिक्षकांचा सत्कार मुख्याध्यापिका विमल जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

आभार मुख्याध्यापक विजय कुरणे यांनी मानले.