Saturday, 31 August 2024

ओंकार वडर, समर्थ पाटील यांची कॅरम स्पर्धेत बाजी; मनपास्तर शालेय कॅरम स्पर्धा



कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने विवेकानंद महाविद्यालयात पार पडलेल्या मनपास्तर शासकीय शालेय कॅरम स्पर्धेत मुलांच्या गटात ओंकार वडर, समर्थ पाटील, पृथ्वीराज घोडे; तर मुलींमध्ये श्रेया मातीवडकर, ईश्वरी पाटील, धनश्री गोरे यांनी १४, १७, १९ गटांत प्रथम क्रमांक पटकावला.
गणित विभागप्रमुख प्रा. एस. पी. थोरात व प्रा. शिल्पा भोसले यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

१४ वर्षे मुलांच्या गटात ओमकार वडर (माझी शाळा विद्यालय) याने प्रथम, विशाल कळंत्रेने (न्यू हायस्कूल) द्वितीय व आरुष पवारने (माईसाहेब बावडेकर अकॅडमी) तृतीय क्रमांक मिळवला. याच गटात मुलींमध्ये श्रेया मातीवडकरने प्रथम, समीक्षा साजनीकरने द्वितीय (नानासाहेब गद्रे हायस्कूल ), व आदिती शिंदे (तवनापा पाटणे हायस्कूल ) तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे मुलींमध्ये ईश्वरी पाटील प्रथम (विमला गोइंका इंग्लिश स्कूल), पूर्वा परीटने द्वितीय (राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, जुना बुधवार) व निकत सय्यदने (आदर्श प्रशाला) तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे मुलांमध्ये समर्थ पाटीलने (सेंट झेव्हिअर्स हायस्कूल) प्रथम क्रमांक प्राप्त केला. वंश वाझेने द्वितीय (सेवंथ डे स्कूल) व ऋषिकेश कुंभारने (विवेकानंद कॉलेज) तृतीय क्रमांक मिळवला. १९ वर्षे मुलांमध्ये पृथ्वीराज घोडेने प्रथम (विवेकानंद कॉलेज), संस्कार पाटीलने द्वितीय व ऋषिकेश चौगुलेने तृतीय (विवेकानंद कॉलेज) क्रमांक मिळवला. याच गटात मुलींमध्ये धनश्री गोरेने प्रथम (विवेकानंद कॉलेज), समृद्धी बरालेने द्वितीय (राजर्षी छत्रपती शाहू जुनिअर कॉलेज जुना बुधवार) व प्राची चौगुले (विवेकानंद कॉलेज ) तृतीय क्रमांक मिळवला.
फोटो : २८०८२०२४-कोल-कॅरम स्पर्धा

फोटो ओळी : मनपास्तर कॅरम स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांसोबत सचिन पांडव, किरण खटावकर, संतोष कुंडले, ॲलन फर्नांडिस उपस्थित होते.

No comments:

Post a Comment