हेरले / प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र माध्य.व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे 61 वे मुख्याध्यापक शैक्षणिक.संमेलन दि.28 व29 डिसेंबर 2024 या कालावधीत लातूर येथील औसा रोडवरील थोरमोटे लाॅन्स येथे आयोजित करण्यात आले आहे .राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दादाजी भुसे यांची उपस्थिती राहणार आहेत तर सकाळी 10.30 वा.सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन होईल स्वागताध्यक्ष पदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख तर संमेलनाध्यक्ष म्हणून मा.प्राचार्य बाबूराव जाधव व कार्याध्यक्ष पदी हनुमंत साखरे यांची निवड झाली आहे लोकनेते स्व.विलासराव देशमुख नगरीत पार पाडणाऱ्या संमेलनास खा.डाळ.शिवाजीराव काळगे ,खा.ओमराजे निंबाळकर ,मा.मंत्री अमित देशमुख, मा.मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मा.मंत्री आ.संजय बनसोडे ,आ.विक्रम काळे ,आ.अभिमन्यू पवार, आ.सतीश चव्हाण, आ.धीरज देशमुख, आ.जयंत आसगावकर आदी उपस्थित राहणार आहेत या संमेलनात विविध शैक्षणिक.विषयावर व्याख्यान व शोधनिबंध सादर होणार आहेत. तरी प.महाराष्ट्रातील तमाम मुख्याध्यापक बंधुभगिनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी,राज्य अध्यक्ष केरभावु ढोमसे, उपाध्यक्ष नंदकुमार बारावकर ,.महाराष्ट्र माध्य.व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ अध्यक्ष डी.पी.कदम ,उपाध्यक्ष मनोहर पवार, संमेलन संघटक विनोद पाटील, माजी.संमेलनाध्यक्ष खंडेराव जगदाळे ,संघटक बबन काटकर ,सुरेश वनमोरे, सोपान कदम ,सांगलीकर स ईद अहमद ,सुभाष कोळेकर ,जे.के.पाटील, जे.डी.जाधव ,श्रीम.रोहिणी निर्मळे अर्जुन सांवत नेमाडे सर व प्रसिद्धी प्रमुख सुधाकर निर्मळे यांनी आवाहन केले आहे
No comments:
Post a Comment