*राजर्षी शाहू विद्यामंदिर शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ*
प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर अंतर्गत राजर्षी शाहू विद्यामंदिर मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव सुरुवात झाली .विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्यावतीने वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन दिनांक 2 डिसेंबर 2024 व 3 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आकाशवाणी कोल्हापूर रेडिओ केंद्राचे प्रमुख संचालक डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय श्री जालिंदर घेवदे माननीय चंद्रकांत पाटील, भारतवीर मित्र मंडळचे मा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले, शरद पाटील,नवनाथ चौगले, दिगंबर दळवी,अभिजित जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अजितकुमार पाटील सर होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. तसेच उत्तम पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. क्रीडा मशाल दौड घेण्यात आली.
या क्रीडा महोत्सवात 9 वर्षे,11 वर्ष,14 वर्ष या वयोगटात कबड्डी लंगडी,पोटॅटो रेस,लिंबू चमचा या खेळांचे आयोजन करण्यात आले.
या महोत्सवासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार,मिनाज मुल्ला, आसमा तांबोळी, विद्या पाटील, दिपाली यादव,बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, शिक्षिका सावित्री काळे व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश सुतार,कांचन हुलस्वार,संध्या दाभाडे, अमृता कांबळे व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.नऊ वर्ष अकरा वर्ष खेळाचे नेतृत्व विद्या पाटील,कल्पना पाटील,मिनाज मुल्ला, सावित्री काळे,तमेजा मुजावर यांनी केले.
सूत्रसंचालन उत्तम पाटील व हेमंतकुमार पाटोळे यांनी केले.
आभार कल्पना पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment