हेरले /प्रतिनिधी
हेरले येथील हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेश पाटील यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री यांनी राजेश पाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा स्कार्फ घालून त्यांचे स्वागत केले.
माजी सभापती राजेश पाटील यांच्या शिंदेसेना प्रवेशाने रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकारण बदलणार आहे. रुकडी जिल्हा परिषद मतदार संघात खासदार धैर्यशील माने यांचे कट्टर विरोधक म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेश पाटील यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शिंदेसेनेकडून पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. शिंदेसेनेकडून खा. धैर्यशील माने आणि जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात २०१७ च्या निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पत्नी डॉ. पद्माराणी पाटील यांनी खासदार माने यांच्या पत्नीचा पराभव केला होता. गेली सात वर्षे कट्टर विरोधक आता एकत्र आले आहेत. रुकडी व हेरले दोन जिल्हा परिषद मतदार संघ होतील असे समजते. राजेश पाटील यांचा शिंदे शिवसेनेत खासदार धैर्यशील माने यांनी प्रवेश केल्याने या दोन्ही जिल्हा परिषद मतदार संघावर खासदारांचे वर्चस्व राहणार आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनीर जमादार, श्री छत्रपती शिवाजी सोसायटीचे चेअरमन अशोक मुंडे , माजी उपसरपंच संदीप चौगुले, श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकारी दूध संस्थेचे चेअरमन सुनील खोचगे यांचा शिवसेना प्रवेश झाला.यावेळी उदय वड़ड, सूरज पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासो माणगावे तुषार आलमान उपस्थित होते.
फोटो
हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
No comments:
Post a Comment