देश समृद्ध व सशक्त नागरिक घडवण्यासाठी संविधान आवश्यक :आमदार विनय रावजी कोरे
संविधान महावाचन सप्ताह या उपक्रमाची "युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद
हेरले / प्रतिनिधी
भारतात विविध जाती धर्म पंत वर्गाचे लोक आहेत. या देशात गीता, बायबल, कुराण, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी अशा धर्मग्रंथांचे पारायण केले जाते.त्याच पद्धतीने आज आदर्श गुरुकुल विद्यालय मध्ये संविधानाचे वाचन व जागर चला जातो ही अभिमानाची बाब आहे.भारतीय संविधान हे केवळ पुस्तक नसून तर संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे : असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
श्री माने पुढे म्हणाले की "मला अभिमान आहे की तुम्ही संविधान वाचन केलेले जागृत उमेदवारी होणार आहात.हे संविधान प्रत्येकाच्या मनामनात ऊर्जा ज्योत निर्माण करेल.या संविधान वाचन सप्ताहामध्ये ११११ राष्ट्र सैनिक बनवत आहात ही अभिमानाची बाब आहे.यातील एखादा सुजाण विद्यार्थी भविष्यात देशातील पंतप्रधान बनतील यात शंका नाही."
देश समृद्ध व सशक्त नागरिक घडवण्यासाठी संविधान आवश्यक :आमदार विनय रावजी कोरे
आमदार विनय रावजी कोरे बोलताना म्हणाले की "सामान्य कुटुंब मध्ये जन्मलेला असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला दिले. भारतीयांना आपले हक्क अधिकार कर्तव्याचे जाणीव झाली आहे. हा देश एखाद्या व्यक्तीमुळे किंवा नेत्यामुळे चालत नाही तर भारतीय संविधानामुळे हा देश चालतो.विविधतेने नटलेल्या भारतीयांना संघटित करून देश समृद्ध व सशक्त नागरिक घडवण्यासाठी संविधान आवश्यक आहे.
एस.एस.सी बोर्ड विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर बोलताना म्हणाले की "देशातील महत्त्वाचा दुसरा उत्सव म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे.भारतीय संविधान हे केवळ जगातील सर्वात मोठे संविधान नसून सर्वश्रेष्ठ संविधान आहे.
स्वागत प्रास्ताविक मध्ये डॉ. डी. एस घुगरे" म्हणाले की गेल्या सात दिवसापासून दररोज चार तास या संविधानाचे वाचन हे ११११ विद्यार्थी करीत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी व देशाप्रती श्रद्धा वाढवण्यासाठी या संविधानाचे वाचन आम्ही करत आहोत महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील हे विद्यार्थी असून भविष्यात हे आदर्श व्यक्ती बनतील.
चौकट.......
११११ विद्यार्थ्यांनी ७ दिवस ४ तास संविधान महावाचन सप्ताह केल्याचे नोंद.युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड याची नोंद झाली. आमदार विनयरावजी कोरे,खासदार धैर्यशील माने व आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन आदर्श गुरुकुल शिक्षण समूहास सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment