हेरले /प्रतिनिधी
पुलाची शिरोली गावचा समावेश कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये न करता, शिरोली गावासाठी स्वतंत्र नगरपरिषद मंजूर करावी. अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने करण्यात आली.याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात प्रस्तावित असलेल्या हद्दवाढीमध्ये पुलाची शिरोली या गावचा समावेश न करता, पुलाची शिरोली गावची भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन स्वतंत्र नगरपरिषद मंजूर करावी.या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले व माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना, जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पुलाची शिरोली गावाची भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्येचा विचार करता गावासाठी स्वतंत्र नगरपरिषद होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
निवेदनावर बोलताना नामदार प्रकाश आबिटकर यांनी या विषयावर जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी जि.प.सभापती प्रवीण यादव, माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण, माजी ग्रा.पं. सदस्य शिवाजी पाटील ,शिवसेना उबाठा उपशहरप्रमुख अशोक खोत, सर्जेराव डांगे, सिद्धू पुजारी व इतर ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो..
पुलाची शिरोली गावाचा कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत समावेश न करता स्वतंत्र नगरपालिका मंजूर करावी याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देताना संजय चौगुले, डॉ.सुजीत मिणचेकर, महेश चव्हाण, शिवाजी पोवार आदी.
No comments:
Post a Comment