हेरले (प्रतिनिधी ) मौजे वडगाव (ता . हातकणंगले)
येथील विद्या मंदिर मौजे वडगाव या प्रशालेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) ओम प्रकाश यादव यांनी अचानक सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेचा स्वच्छ आणि सुंदर परिसर, पर्यावरण पूरक वातावरण, शाळेने सुरू केलेली वाचन चळवळ , इत्यादी बाबत समाधान आणि आनंद व्यक्त करत एक उपक्रमशील शाळा म्हणून शाळेचा गौरव केला.
यावेळी यादव यांनी इ. तिसरी, आणि सहावी- सातवीच्या वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधला. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्यासोबत सहाय्यक गटविकास अधिकारी
यु. के. महाले आणि विस्तार अधिकारी ए. एस. कटारे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रा पं . सदस्य अविनाश पाटील, उपसरपंच स्वप्नील चौगुले , माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील खारेपाटणे , सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे पाटील , हेरले केंद्राचे केंद्रप्रमुख शहाजी पाटील , अध्यापक देवदूत कुंभार , फिरोज मुल्ला , यांच्यासह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते .
No comments:
Post a Comment