हेरले / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी विकास संस्थेचे वाटचाल सहकारातून समृद्धीकडे होत आहे. भविष्यात या छत्रपती ग्रुप माध्यमातून नवीन संस्था उदयास येणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी केले.
ते श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेची ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
यावेळी संस्थेचे सचिव नंदकुमार माने यांनी अहवाल वाचन केले तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन कपिल भोसले होते .मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली.
चेअरमन कपिल भोसले म्हणाले,गेली काही वर्षांमध्ये संस्थेमध्ये अत्यंत काटकसरीने कारभार केला असल्याने ठेवी व कर्जामध्ये वाढ झाली असल्यामुळे संस्थेस ७ कोटी ४२ लाख रुपये पर्यन्त कर्ज वाटप तर ५ कोटी पर्यंतच्या ठेवी संस्थेकडे असून यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा भागिल्या जात आहेत.भविष्यात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा अन्य सुविधा तसेच अन्न उपक्रम राबविण्यात जाणार आहेत. संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळ व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे.
संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच राहुल शेटे,माजी उपसभापती अशोक मुंडे सर,मुनिर जमादार,अरविंद चौगुले, बाबासाहेब कोळेकर, यांनी मनोगते व्यक्त केली.
या सभेस सरपंच राहुल शेटे,,ग्रा. सदस्य हीरालाल कुरणे, राकेश जाधव, मनोज पाटील शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगुले ,माजी चेअरमन अशोक मुंडे सर, व्हा चेअरमन स्वप्निल कोळेकर, उदय चौगुले, कृष्णात खांबे, शशिकांत पाटील, सुनील खोचगे, नितीन चौगुले, संजय पाटील, राजेंद्र कदम, शांतादेवी कोळेकर, सुजाता पाटील,मुनीर जमादार,सुकुमार कोळेकर, रावसाहेब चौगुले, पांडू चौगुले, संजय परमाज,आदी मान्यवरांसह सभासद, संस्थेच कर्मचारी, हितचिंतक मोठया संख्येंनी उपस्थित होते आभार व्हा. चेअरमन स्वप्निल कोळेकर तर सूत्रसंचालन सुरेश चौगुले सर यांनी केले.
फोटो:-हेरलेत छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेत मार्गदर्शन करत असताना माजी सभापती राजेश पाटील
No comments:
Post a Comment