Kolhapur mh9Live Reporter संकलीत वार्ता
सळसळते भगवे झेंडे, भगव्या टोप्या , भगवे स्कार्फ आणि निःशब्द वातावरणात गर्दीचे सारे विक्रम मोडीत काढले . लाखोंच्या संख्येने निघालेल्या या विराट मोर्चात तरुणाई आणि महिलांची संख्या लक्षणीय राहिली . त्यांच्या हातातील विविध फलकांनी आपल्या न्याय्य मागण्या मांडल्या. सकाळी सातपासूनचच शहराच्या विविध ठिकाणांहून सुरू झालेला हा निःशब्द हुंकार साडेबाराच्या सुमारास महाएल्गारात रूपांतरीत झाला. आणि त्याने कोपर्डी घटनेतील नराधमांवर कठोर कारवाई , मराठा आरक्षणासह विविध मागण्यांची एकमुखी मागणी सुरू केली.रणरागिणी ताराराणींच्या वेशभूषेत मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती . मात्र, शोभायात्रेपेक्षा " हेच आमचे प्रेरणास्थान आहे . आम्ही पेटून उठलोय अन्यायाच्या विरोधात आणि न्याय मिळवूनच मागे हटणार , ' असे सांगण्याचाच प्रामाणिक प्रयत्न होता.
डोक्यावर पांढऱ्या , भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, गळ्यात स्कार्फ, साड्या आणि कोपर्डी घटनेची चेहऱ्यावर दिसणारी तिडीक अशा वातावरणात मराठा क्रांती मोर्चातील महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला . शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठमोळ्या माता-भगिनींसह तरुणी लाखोंच्या संख्येने सहभागी झ ाल्या होत्या
सिंधुदुर्गाची लोकसंख्या अंदाज साडेआठ लाख. 34%मराठा समाज आहे आजच्या मोर्चात इत्तर समाजाचे लॉक सामिल होत आपला पाठिंबा दिला.
शहरातील महिलांपेक्षा ग्रामीण भागातील दैनंदिनी जराच वेगळीच . पहाटे उठायचे . दुभत्या जनावरांची देखभाल , चारा - पाण्याची व्यवस्था करायची , धारा काढायच्या आणि शेताची वाट धरायची . आज या कामांना सुटी देत ऐतिहासिक " मराठा मोर्चा 'च्या साक्षीदार होण्यास आतुर झालेल्या महिलांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या वाहनाने शहरात दाखल झाले . पहाटेपासूनच शहराच्या वेशीवर थंडीची तमा न बाळगता दिवसभर लागणारी न्याहरी सोबत घेऊनच त्या वाहनातून उतरल्या. तेथून थेट चालत मोर्चाच्या मार्गावर सहभागी झाल्या .
घराला कुलूप ', चूल बंद करून मोर्चात सहभागी व्हा , या संयोजकांच्या व मराठा कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने महिला घराला कुलूप लावूनच मोर्चात उतरल्या. मोर्चात महिला , तरुण अग्रभागी राहिल्या . या महिलांना पुढे जाण्यासाठी वाट करून देण्यापासून ते रस्त्याच्या एका बाजूला त्यांना सहभागी करून घेण्यासाठी स्वयंसेवकांचीही धांदल उडाली.
" ना नेता , ना घोषणा ' असे स्वरूप असलेल्या या मोर्चाबाबत ग्रामीण भागातील महिलांत मोठी उत्सुकता होती . राज्याच्या इतर जिल्ह्यांत निघालेल्या मोर्चाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचल्याने सिंधुदुर्गच्या मोर्चात कधी सहभागी होतोय , अशाच काहीशा भावना या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या . त्यामुळे ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे महिला सहभागी झाल्या . अनेक महिलांच्या कडेवर लहान मूल, हाताचे बोट धरून चालणारी मुलं - मुली आणि ज्येष्ठ महिलांना सांभाळत निघालेल्या तरुण मुलींनी मोर्चा यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग घेतला आहेङा .
कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी , मराठा समाजाला आरक्षण मिळावे , ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा , शेतीमालाला हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांना च मिळावी या मोर्चाच्या मागण्यांचे महिलांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते . मोर्चात सहभागी झालेल्या महिलांना जागोजागी पाणी, खाऊ , फळे वाटप करणारे पाठबळ देत होते.
सकाळी दहापासून सुरू झालेल्या फक्त एक मराठा लाख मराठा दिसू लागला.
चारचाकी , दुचाकी, रुबाबदार बुलेटवर भगवा झेंडा , डोक्यावर भगव्या टोप्या घालून , लोक टेम्पो , जीप भरून जथ्याजथ्याने येत होते.साधारण दहाच्या सुमारास सिंधुदुर्गनगरी गजबजू लागली होती. अबालवृद्धांचा सहभाग मोर्चात वेगळीच ऊर्जा निर्माण करीत होता . साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास मुख्य चौकात गर्दी वाढली . बघताबघता मुख्य चौक भगवा दिसू लागला. बहुतांशी लोकांच्या हातात भगवे झेंडे होते.
सिंधुदुर्गातील मोर्चा " न भूतो न भविष्यति ' असा असेल, अशी वातावरणनिर्मिती गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरू होती . आज प्रत्यक्षात सिंधुदुर्गवासियांना याची अनुभुती आली . " ना नेता , ना घोषणा ' हे राज्यभरातील मोर्चांचे स्वरूप सिंधुदुर्गातही कायम होते . मोर्चाला अनेक समाजांनी पाठिंबा दिला
No comments:
Post a Comment