Friday, 18 November 2016

इस्रोच्या इंजिनिअरची चहा वाटपाची अनोखी समाजसेवा

देणार्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे या उक्तीप्रमाणे किडवाई मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बंगलोर येथे सर्व पेशंटना राकेश नायर नावाची व्यक्ती रोज सकाळी न चुकता गरमा गरम चहा मोफत वाटप करतात , तुम्हाला वाटले असेल हि व्यक्ती गर्भ श्रीमंत , उद्योगपती असेल पण नाही राकेश नायर इस्रोमध्ये जुनिअर इंजिनिअर म्हणून देशसेवा करीत आहेत , रोज सकाळी १०० बालरुग्णांसह जवळपास ६०० रुग्ण त्यांच्या चहाची वाट पाहत असतात , या कामी त्यांना त्यांचे कुटुंबीय व इतर सहकर्मी मदत करतात

सुरुवातीला ते औषध वाटप करत असत पण एकदा त्यांची सासू अमृतसर च्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना तेथील एक सफाई कामगार रोज रुग्णांना मोफत चहा आणून द्यायचा हे पाहून त्यांनी प्रेरणा घेतली , कॅन्सरशी झुंजणाऱ्या रुग्णांना त्यांचा सकाळचा चहाचा घोट म्हणजे अमृतासमान भासतो
काही रुग्ण आणि नातेवाईकांनी त्यांचे कार्य पाहून त्यापासून प्रेरणा घेत आपल्या गावातील सरकारी हॉस्पिटल मध्ये मोफत चहा वाटप सुरु केले आहे
त्याच्या  अनोख्या समाजसेवेला कोल्हापूर mh9 live news चा सलाम
आपल्याला हि बातमी आवडल्यास अवश्य शेअर करा

No comments:

Post a Comment