Thursday, 17 November 2016

बड्या उद्योगपतींची कर्जमाफी निव्वळ अफवा

स्टेट बँक ऑफ इंडियाने विजय माल्या यांचं कर्ज राईट ऑफ म्हणजे निर्लेखित केलं आहे. पण कर्ज निर्लेखित करणं म्हणजे कर्ज माफ करणं नाही, असं स्पष्टीकरण काल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलं. बँकांनी दिलेलं कर्ज वसूल करण्याचा बँकांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ही यादी तयार करण्यात आलीय, कर्जवसुलीसाठी पाठपुरावा सुरूच राहील,असं अरुण जेटली म्हणाले.
स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत कर्जदारांना सुमारे 7 हजार कोटींचं कर्ज माफ करण्यात आलंय अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती पण हि बातमी म्हणजे अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे , अश्या अर्धवट बातमीमुळे लोकांचा प्रसारमाध्यमांवरील विश्वास उडू शकतो  

No comments:

Post a Comment