Wednesday, 30 November 2016

जिल्हा बँकांचे खाते व्यवहार सरकार तपासणार

५०० व १००० नोटाबंदीनंतर या नोटांची उलाढाल नक्की कशी झाली याबद्दल सरकार चौकशी करणार आहे. सहकारी बँकांमधली कर्जखाती आणि मोठ्या रकमेची खाती नक्की कुणाची आहेत, या खात्यांमधली रक्कम नक्की कुठून आली याचीही तपासणी करण्यात येणार आहे.
अनेकठिकाणी रोखपालाकडुन ५०० व १०००च्या नोटा धनदांडग्यांना मागिल तारखेवर बदलुन दिल्याचे आढळत आहे , काहीजनांना निलंबीतही करण्यात आले आहे
जर एखाद्याचं जिल्हा बँकेत खातं असेल तर त्या व्यक्तीच्या इतर बँकांच्या खात्यांचा तपशीलही तपासून घेतला जाणार आहे. वेगवेगळ्या खात्यांतून झालेला करोडोंचा व्यवहार नक्की कुणी आणि का केला याचीही माहिती तपासली जाईल. जिल्हा बँकांचे व्यवहार सरकारकडून तपासले जाणार असल्याने अनेकांचं धाबं दणाणलंय.

No comments:

Post a Comment