याना एक अस्पर्श अद्भुत पवित्र स्थान असून यामागे भस्मासुर वधाची आख्यायिका सांगितली जाते , या ठिकाणी शन्कर प्रसन्न होऊन वरदान मिळाल्याने मदमस्त झालेला राक्षस सर्व देवांना भस्म करू लागला , विष्णू देवाने मोहिनीचे रूप घेतले , भस्मासुराला भुलवून आपल्याकडे आकर्षित केले , भस्मासुराने मोहिनीची इच्छा धरताच त्याला आपल्यासारखे नृत्य करण्यास सांगितले , नृत्य करताना मोहिनीने गुहेत आपल्या मस्तकावर हात ठेवला , भस्मासुराने सुद्धा मस्तकावर हात ठेवताच तो जळून खाक झाला आणि त्याच्या राखेच्या अवशेषातून याना शिखरांची निर्मिती झाली म्हणून हे एक स्वयंभू अस्पर्श स्थान आहे
याना हि कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा जवळ एक लहान टेकडी आहे. जी भैरवेश्वर सुळका आणि मोहिनी सुळका या दोन काळया स्फटिकासारखे चुनखडी दगडापासून नैसर्गिकरित्या तयार झाली आहे . सह्याद्री पर्वतराजी मध्ये नयनरम्य हिरव्या पार्श्वभूमी मध्ये स्थित आहे , या अद्भुत शिखराना पाहताक्षणीच कोणत्याही निसर्गप्रेमीच्या डोळयांचे पारणे फिटते हा भाग खडक ,दगड गोटे घनदाट झाडी , जंगल व पाण्याच्या प्रवाहाने वेढला आहेत; पश्चिम घाटाच्या सुंदर अशा वन्रजीने नटलेल्या या भागात, ट्रेकींग करणे प्रत्येक साहसी पर्यटकांचे एक स्वप्न असते .
याना हे ठिकाण कुमट्यापासून 25 km आणि कारवारपासून 62 km अंतरावर स्थित आहे याना गावात आपले वाहन लावून पायथ्यापासून या विलक्षण उंच खडक शिखरांपर्यंत पोहोचण्यासाठी 1.5 किमी ट्रेक चालत जावे लागते , याना हे पवित्र आणि धार्मिक स्थळ असून महाशिवरात्रीला येथे भाविकांचा लोंढा लागलेला असतो येथील मंदिरात पवित्र शिवलिंग असून त्यावर पाण्याची थेम्ब थेम्ब संतत धार वाहत असते जणू गंगाच शंकराच्या जटेतून प्रगट झाल्यासारखी तुम्ही या ठिकाणापासून जवळच गोकर्ण महाबळेश्वर , मुर्डेश्वर , जोग फॉल्स अशा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता
No comments:
Post a Comment