Tuesday, 8 November 2016

साखरसम्राज्ञी

शून्यातून विश्व निर्माण करणारे काही मोजकेच. विद्या मुरकुंबी यांनी "शून्या'तून जरी सुरवात केली नसली, तरी त्यांनी विश्व निर्माण केले.
श्री रेणुका शुगर्सचा पहिला साखर कारखाना उभारला आणि त्यानंतर मागे वळुन पाहिलेच नाही , सहकारी साखर कारखाने कर्जाच्या विळख्यात पडुन बंद पडत असताना त्यांनी केलेले धाडस हे असामान्यच म्हणावे लागेल ,

विद्या मुरकुंबी मूळच्या बेळगावच्या; सुरवातीचे कार्यक्षेत्रही बेळगावच असणाऱ्या विद्या मुरकुंबी "सायन्स'च्या पदवीधर.
पती मधुसूदन मुरकुंबी यांची टाटा चहा आणि पार्ले बिस्किटांची एजन्सी होती. गृहिणी म्हणून सुरवात करणाऱ्या विद्याबाईंची एक नजर या व्यवसायाकडे होती; पण नवे काहीतरी करण्याची ऊर्मीही स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्यांनी मुरकुंबी बायोऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड आणि मुरकुंबी बायोटेक इंडस्ट्रीज अशा उद्योगांमध्ये पदार्पण केले. पतीच्या निधनानंतर त्यांना वितरण व्यवसायाची जबाबदारी सांभाळावी लागली. त्याच काळात त्यांचा मुलगा नरेंद्र इंजिनिअर बनला होता
विद्या मुरकुंबी आणि त्यांच्या मुलाचे लक्ष साखर उद्योगाने वेधले. खरेतर त्यांना स्वतःचा नवा साखर कारखाना उभारायचा होता; पण त्यासाठी लागणारे किमान 100 कोटींचे भांडवल त्यांच्याकडे नव्हते. मग त्यांनी आजारी साखर कारखान्यांचा शोध सुरू केला आणि आंध्र प्रदेशातील हिंदूपूरमधील निजाम शुगर्स कारखान्याने त्यांनी "खरेदी'चा मुहूर्त केला. सात वर्षे बंद असलेला सरकारी मालकीचा हा कारखाना त्यांनी 1998मध्ये खरेदी केला आणि सर्व यंत्रोपकरणे बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावात आणली. त्याच यंत्रांतून तेथे उभा राहिला श्री रेणुका शुगर्सचा पहिला साखर कारखाना आणि तेव्हाच "श्री रेणुका शुगर्स' हे नावही अस्तित्वात आले; सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या "रेणुका' या नावाने.

सुरवात त्यांनी सौंदत्ती तालुक्यातील ऊस उत्पादकांपासून केली होती. प्रत्येक ऊस उत्पादक हा कारखान्याचा भागधारक असेल आणि कंपनीच्या नफ्या-तोट्याचा भागीदार असेल ही संकल्पना त्यांनी राबवली.
त्यातून भांडवल उभे राहिले. त्या भांडवलावरच स्थापनेच्या केवळ 18 महिन्यांतच म्हणजे 2000 मध्ये 11.2 मेगावॉट क्षमतेचा सहवीज प्रकल्प अस्तित्वात आला; 2001 मध्ये 60 हजार लिटर प्रतिदिन क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पही सुरू झाला. या कारखान्याचे 21 टक्के शेअर शेतकऱ्यांकडे आहेत.

साखर कारखान्यांचा हंगाम चालतो जास्तीत जास्त सहा महिने. त्यामुळे उर्वरित सहा महिने हे कारखाने खऱ्या अर्थाने बंद असतात. या कालावधीत उपलब्ध यंत्रणेचा कसा वापर करता येईल, या विचाराने मुरकुंबींना झपाटले आणि कच्च्या साखरेचे शुद्धीकरण ही कल्पना उदयास आली. 2002 मध्ये मुन्नोळीतच साखर शुद्धीकरण प्रकल्प (शुगर रिफायनरी) आकारला गेला. कच्च्या साखरेची आयात खुली झाल्यानंतर हा व्यवसाय वाढीस लागला.
कंपनीने 2003 मध्ये पहिल्यांदा साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतला. 2005 मध्ये श्री रेणुका शुगर्स "पब्लिक लिमिटेड' झाली आणि शेअर विकून भांडवलही उभारू शकली. "खरेदी'ची पुनरावृत्ती करताना सिंदखेडचा कारखाना खरेदी करून तो अथणीला हलवला. त्यानंतर अथणी तालुक्यात ग्रीनफील्ड प्रकल्प; हावलगा, रत्नप्रभा, गोकाकमध्ये मालकीचे कारखाने, तर आळंद, रायबाग (दोन्ही कर्नाटक) आणि आरग (जि. सांगली, महाराष्ट्र) येथे भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतले कारखाने,

हिंदूपूर या आडगावात अडचणीत आलेला साखर कारखाना त्या खरेदी करतात काय आणि सहाच वर्षांत स्वतःच्या साखर उद्योगाची चक्क शेअर बाजारात नोंदणी करतात काय!

सारीच वाटचाल स्वप्नवत...

म्हणूनच साखरसम्राज्ञी हिच उपमा त्यांना यथार्थ ठरते !

No comments:

Post a Comment