Saturday, 19 November 2016

श्री जोतिबा

दख्खनच्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थश्रेत्र म्हणजे क्षी.क्षेत्र रत्नाद्री होय.

या क्षेत्रालाच भक्त जोतिबा डोंगर असं म्हणतात असे हे अनुपम तीर्थराज पवित्र तीर्थश्रेत्र सह्याद्रीच्या दक्षिणेकडील रांगेत प्रसिध्द पन्हाळ गडाच्या पूर्वेस वसलेले आहे.समुद्रसपाठी पासुन सुमारे ३१०० फूट उंचीवर असलेले हे क्षेत्र कोल्हापूरच्या वायव्येस २० किमी अंतरावर आहे.
मंदीर : श्री केदारनाथ मंदीर हे क्वचितच आढळणारे दक्षिणाभिमुख असे मंदीर आहे.मंदिर हेमाडपंथी या प्रकारातील असून त्याचा कालखंड करवीरवर राज्य करणाऱ्या ७ व्या शतकातील भोज शीलाहावंशीय समकालीन असून ११ व्या शतकापासून आज पावेतो त्याचा तीन वेळा जीर्णोध्दार झालेला आहे.

सध्याच्या मंदिराचा जीर्णोध्दार ग्वाल्हेरच्या शिद्दांचे मूळ वंशज यांनी इ.स.१७३० साली केला.

व्दापाराच्या शेवटी पृथ्वीवर करवीर कोल्हापूर रक्तभोज रत्नासूर या सारखे अनेक राक्षस शिवशंकराच्या वरदानाने उन्मत झाले होते.
त्यातच भर पडली अगस्तीशिष्य विध्यांद्रीची,नारदानी त्याला हिमालयाशी बरोबरी न करण्यातच तुझा शहाणपणा आहे हिणवल्यामुळे तो चिडला आणि उंच वाढला त्यामुळेसुर्यालासुध्दा अडथळा निर्माण झाला.

विध्यांद्रीच्या उंचीने दक्षिणेकडे अंधकार माजला त्यातच उन्मत राक्षसांनी अनाचार व अत्याचाराने सर्व प्राणीमात्रांना त्रस्त केले.त्यावेळी सर्व देवांनी विध्यांद्रीचा अडथळा दूर करण्यासाठी विनवले.तेव्हा अगस्ती दक्षिण यात्रेला निघून गेले.त्यामुळे विध्यांद्रीचा अडथळा दूर झाला.पण उन्मत राक्षसाच निर्दालन करण्यासाठी सर्व प्राणीमाञाबरोबर सर्व देवांनी महालक्ष्मीला साकडे घातले.परंतु योगदंडाचे वरदान असलेल्या करवीर कोल्हासुराची राक्षसांना वधण्यासाठी सर्व शक्तिमान अशा ज्योतिर्मय स्वरुपालाच साकडे घालण्याशिवाय अन्य कोणत्याही इलाज नसल्याने महालक्ष्मीने हिमालयावर जाऊन शुध्द सनातन ज्योतिर्मय स्वरुपालाच अवतार घेण्याविषयी विनवले.

त्याचवेळी हिमालयावर पौगंडऋषी व विमलांबुजा हे उभयता शुध्द सनामन ज्योतिर्मय स्वरुपाने अवतार घ्यावा म्हणून घोर अशी ब्रम्हकल्प पर्यंत तपस्या करीत होते.

महालक्ष्मी,विमलांबुजा आणि पौगंडऋषीच्या तपस्येवर प्रसन्न होऊन पूर्णब्रम्ह सनातन ज्योतिर्मय स्वरुप परमात्मा अयोनी संभव म्हणजे कोणत्याही योनीतून जन्म न घेता आठ वर्षाच्या रूपात हिमालयावर चैञ शुध्द षष्ठीयुक्त सप्तमीला रविवारी ठिक सुर्योदयाला प्रकट झाले.

या अलौकिक अवताराचे गर्ग मुनीनी मोक्ष देणारा म्हणून “केदार” असे नामकरण केले.
हाती असणारे अमृतपात्रं पायातील शेष हे सत्वगुणाचे म्हणजे विष्णुचे तसेच हाती असणारे त्रिशूल व डमरु आणि भैरव स्वरुप हे तमोगुणाचे म्हणजेच शिवाचे प्रतीक आहे.

त्याचप्रमाणे क्रोधरुपी जमदग्नी व सूर्यरूपी तेजाचा एकत्रीत अवतार म्हणजे दख्खनचा राजा दख्खनकेदार होय.

हिमालयातून व दक्षिणेकडे येऊन सर्व राक्षसांचे निर्दालन केले व महालक्ष्मीचा करवीरमधे राज्याभिषेक केला व नाथ परत निघाले असता महालक्ष्मीने नाथाना विनवले आणि मैनाकगिरी पर्वतावर म्हणजेच रत्नाद्री (रत्नांचा डोंगर) डोंगर (सध्याचा जोतिबा डोंगर ) येथे त्यांचा राज्याभिषेक केला आणि करवीरावर तसेच संकटे आणणाऱ्या दक्षिण दिशेकडे कृपादृष्टी ठेवा असे विनवले व नाथांना जाण्यापासून परावृत्त केले.तेव्हा हा देवाधिदेव केदारनाथ दक्षिण दिशेवर अंकुश ठेवून हाती खड्ग घेऊन क्रमणपद ( चालण्याच्या तयारीत )पावित्र्यात भक्ताला रक्षिण्यासाठी तिष्ठत उभा आहे.

दीन दुबळ्या भाविकांनी अनेक बिरूद त्याला अर्पण केली कोणी नाथांना सौदागर,रवळनाथ,केदारलिंग ज्योर्तिलिंग आणि उपनाम ज्योतिबा असही म्हणतात.

करवीर निवासीनी महालक्ष्मी नाथांचा गजर करताना म्हणते

आमचे भाग्य चांगले म्हणून

तुझा लाभ झाला बोला ।। चांगभल ।।

केदारनाथांच्या नावे ।। चांगभल ।।

असा हा दक्षिण काशीचा मुक्तीदाता केदारनाथ.

No comments:

Post a Comment