पाटण्याहून इंदोर ला जाणाऱ्या इंदोर -राजेंद्रनगर एक्स्प्रेसचा अपघात पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास झाला. कानपूरमधील पुखरैया रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात झाला. अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून या अपघातात आत्तापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते, तर १५० जण जखमी झाले आहेत. रेल्वे पटरी उखडल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाकडून तात्काळ बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी ३० च्या वर रुग्णवाहिका मदत कार्यासाठी वापरण्यात येत असून २५० च्यावर पोलीस मदत कार्यात गुंतले आहेत.
No comments:
Post a Comment