आयएसआय ही संघटना बनावट नोटा केवळ दहशतवाद्यांना किंवा घुसखोरांनाच देते असे नाही. या बनावट नोटांच्या बळावर जम्मू-काश्मीरात पर्यायी अर्थ व्यवस्थाच उभी राहिली आहे. तेथील युवा वर्गाला या बनावट नोटांचे भारतीय चलन म्हणून अमिष दाखवले जाते. त्या बदल्यात जम्मू-काश्मीला अस्वस्थ, धुमसता ठेवण्याचा गनिमी कावा वापरला जातो.
भारतीय अर्थव्यवस्थेत बनावट नोटा घुसवण्याचा पाकिस्तानचा काळा डाव आतापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे , ठार मारलेल्या दहशतवाद्यांकडे ५०० व १००० रुपयांच्या भारतीय मूल्याच्या बनावट नोटा आढळतात
स्थानिक युवकांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर अस्थिर करण्याचे दर सुद्धा ठरलेले आहेत. भारतीय सैन्यदलावर दगड फेकण्यासाठी प्रतिदिन १०० ते ५०० रुपये दिले जातात. भारतीय सैन्यदलाचे शस्त्र हिसकावल्यास ५०० रुपये बोनस असतो. भारतीय सैन्य दलावर हातबॉम्ब फेकण्याचा दर प्रति बॉम्ब १००० रुपये आहे. अशा प्रकारची कृत्ये युवकांकडून करुन घेण्यासाठी फुटीरतावादी नेते सईद गिलानी, यासिन मलिक, शेख याकूब यांचे नेटवर्क वापरले जाते, असा संशय आहे. घातपाती कारवाया करणाऱ्या युवकांना प्रतिदिन वेतन लगेच रोखीने दिले जाते. त्यासाठी ५०० व १००० च्या नोटा वापरल्या जातात. अर्थात, त्या पाकिस्तानातून आलेल्या बनावट नोटा असतात.
देशासमोरील अदृश्य संकट म्हणून उभा असलेला बनावट नोटांचा प्रश्न निकाली काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांचे, त्यांची पुरवठादार आयएसआयचे, जम्मू-काश्मीरातील फुटीरतावाद्यांचे कंबरडे मोडले आहे.
देशातील सर्व प्रकारच्या गद्दारांना ठेचून काढण्यासाठी नोटा बदलांचा वापरलेला गनिमी कावा काय वाईट आहे ?
मोदी व त्यांच्या सरकारने नोटा बंदीचे शस्त्र वापरून देशांतर्गत किटक फवारणी केली आहे. थोडावेळ आपणही बँकांच्या रांगांमध्ये उभे राहून त्रास सहन केला तर देशहितच साध्य होणार आहे.
दिलीप तिवारी, पत्रकार यांच्या ब्लॉगवरुन साभार
No comments:
Post a Comment