Thursday, 1 December 2016

आरोग्यदायी हळद

गुणकारी हळद

हळद अनेक आजारांवर उपयुक्त आहे. हळदीला स्वस्त, गुणकारी व घरगुती औषध मानले गेले आहे. गाठविरोधी (antitumor), अर्थायटिससाठी प्रतिबंध (antioxident antiarthric), हृदयरोग प्रतिबंध (anti-ischemic), सूज प्रतिबंध (inflammatory) अशा विविध आजारांवर हळद गुणकारी आहे.

करक्यूमिन

- हे पॉलिफेनॉल्स असून ह्यामुळे हळदीला पिवळा रंग येतो.
- करक्यूमिनचा विसराळूपणा (अल्झायमर्स) सारख्या आजारात उपयोग होतो.
- हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगांवर ती उपयुक्त आहे तसेच कर्करोगाला प्रतिबंधक असल्यासंबंधी संशोधन चालू आहे. जसे, कोलॉन (colon) कर्करोग, मल्टीपल मायलोमा इत्यादी.
- करक्यूमिनमुळे मेंदूचे कार्यही सुरळीत राहण्यास मदत होते. ह्यासाठी योग्य प्रमाणात हळद वापरली जावी.
- हळदीला liver detoxifier म्हटले जाते. ज्याचा उपयोग अल्कोहोल, काही टॉक्सिन्स, केमिकल्स यांची तीव्रता कमी करण्यास मदत करतात.
- हळद स्निग्ध पदार्थांच्या चयापचयात मदत करते. त्यामुळे वजन योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते.
- हळद ही जखम भरून येण्यास मदत करते. एका प्रकारचे "हिलींग'चे काम हळद करते. छोटी जखम झाल्यास हळदीचा उपयोग करून रक्तस्त्राव सहज थांबविता येतो.
- हळदीच्या योग्य सेवनाने पोटाच्या तक्रारी दूर होऊ शकतात व जुलाब होत असतील तर साल्मोनेला, प्रोटोझोआ यांसारख्या बॅक्टेरियांना हळद प्रतिबंध करते.
- हळद ही निरूपयोगी कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, यासंबंधी संशोधन सुरू आहे.
- साधारणत: रोजच्या आहारामध्ये दोन ते अडीच ग्रॅम हळद घेतली जावी.
- हळदीमध्ये वातशामक आणि कफशामक गुणधर्म आढळतात. त्यामुळे खोकला, घसादुखी झाली तर की हळद घालून गरम दूध प्यायला दिले जावे.

No comments:

Post a Comment