Sunday, 4 December 2016

काही जिल्हा बँकांनी नोटांचे ‘काळ्याचे पांढरे’ केल्याने इन्कम टॅक्सच्या नोटीसा

९ ते १४ नोव्हेंबर या काळात जिल्हा बँकेकडे मोठ्या प्रमाणावर रद्द झालेल्या पाचशे-हजाराच्या नोटा जमा झाल्या.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या नियमाप्रमाणे काही जिल्हा बँकांनी दररोजच्या नोटांचे विवरण दररोज दिले नाही , धनदांडग्यांच्या  नोटांचे ‘काळ्या पैशाचे पांढरे’ केल्याने, राज्यातील सर्वच जिल्हा बँकांचा एकूणच कारभार प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आला आहे.

या काळ्या कारनाम्यामुळेच १४ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र आदेश देत, रिझर्व्ह बँकेने जल्हा मध्यवर्ती बँकांना नोटा स्वीकारण्यास मनाई केली आहे

काही जिल्हा बँकांनी नोटा विवरणाची माहितीच दडवली , ही माहिती दिली नाही. माहिती दडविल्याने संशयाला जागा मिळाली.

No comments:

Post a Comment