गेल्या वर्षी देशातील रस्ते अपघातांमध्ये वाढ होऊन त्यात सुमारे दीड लाख लोक ठार झाले, तर पाच लाखांहून अधिक लोक जखमी झाले अशी माहिती सोमवारी संसदेत देण्यात आली.
२०१५ साली भारतात रस्ते अपघातांमध्ये १,४६,१३३ मृत्यूंची आणि ५,००,२७९ लोक जखमी झाल्याची नोंद करण्यात आली. २०१४ साली हीच आकडेवारी अनुक्रमे १,३९,६७१ आणि ४,९३,४७४ इतकी होती, असे रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितली.
दरवर्षी रस्ते अपघातांमुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ३ टक्क्यांची घट होते, जी किमतीमध्ये ५८ अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक आहे.
यामुळे आतातरी शहाणे व्हा हेल्मेट , सिटबेल्ट , airbag ही सुरक्षा साधने वापरा
▼
No comments:
Post a Comment