केंद्र सरकारनं आता तंबाखूजन्य पदार्थांना देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात येणार असून कोणत्याही तंबाखूमिश्रित पदार्थांचे उत्पादन आणि विक्रीवर तातडीनं बंदी घालण्याचे आदेश केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यानं राज्यांना दिले आहेत. तसेच गुटखा , मावा आणि खर्यावरही बंदी घालण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत.
अपेक्षा करूया प्रशासन या कायद्याची कठोर अंमलबजावणी करेल , नाहीतर गुटखाबंदीचा महाराष्ट्रात तरी सध्या फज्जा उडालेला दिसत असून सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे आणि गुटखा बंदी फक्त कागदावरच आहे
No comments:
Post a Comment