जॅग्वार लँड रोव्हरसाठी नवीन हायटेक फिचर विकसित करत आहे.त्यांच्या येणाऱ्या भावी कारमध्ये कारच्या विंडोखाली कॅमेरे लावण्यात आले आहेत.त्याला पूरक असे सॉफ्टवेअर तयार केले आहे यात कारच्या मालकाचा सेल्फी फोटो सेव्ह केला जातो. मालक कारच्या जवळ येताच हा कॅमेरा मालकाचा फेस डिटेक्ट करुन त्याला ओळखतो आणि कार अनलॉक होवून दरवाजा उघडला जातो. तुमचा चेहरा पाहून या कारचा दरवाजा उघडणार आहे. सेल्फी पाहून ही कार अनलॉक होवून स्टार्ट होईल.आता सध्या जरी जग्वार याचे पेटंट घेणार असले तरी भविष्यात अनेक हाय लेवल कारमध्ये असे हायटेक फिचर पाहायला नक्कीच मिळणार आहे आणि चावी बाळगणे , हरवणे या चिंतांमधून लोकांची सुटका होणार आहे
No comments:
Post a Comment