मानवी शरीरातील यंत्रणेचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला असून मानसिक ताण तणावाचा सर्वाधिक प्रभाव हृदयावर पडत असल्याचे संशोधकांनी मांडले आहे. त्यामुळे मेंदूवरील अतिरिक्त ताण आणि पर्यायाने हृदयरोगाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने संशोधकांनी केलेले हे संशोधन महत्त्वाचे आहे. धूम्रपान, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यामुळे हृदयरोगाचा धोका मोठय़ा प्रमाणावर वाढतो, हे सर्वानाच ठाऊक आहे. मात्र, अतिरिक्त तणाव हा देखील हृदयरोगाला मदत करतो आहे.
मेंदूवर पडणाऱ्या तणावामुळे हृदयरोगाचा धोका संभवतो यासंबंधी कोणत्याही प्रकारचे संशोधन यापूर्वी झालेले नाही. या संशोधनात रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांच्या मेंदूवर पडणारा तणाव आणि हृदयाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर वर्षांनंतर त्यांची पुन्हा तपासणी केली असता रुग्णांना हृदयविकाराचा धोका वाढल्याचे आणि रक्तवाहिन्यांचे रोग बळावल्याचे स्पष्ट झाले. तसेच, यातील रुग्णांना अतिरिक्त तणावामुळे हृदयरोग बळावल्याचे स्पष्ट झाले. बौद्धिक कार्य आणि ताण तणाव यामुळेच रक्तवाहिन्यांवर सूज येणे आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या बंद होणे हे धोके संभवतात.
▼
No comments:
Post a Comment