Wednesday, 18 January 2017

वर्तमानपत्रे झालीत सैराट , कशाची बातमी करावी याचे हरवले भान

वाचकवर्गाला भुरळ घालणार्या थिल्लर बातम्या छापुन टी आर पी वाढवण्याच्या नादात आपण काय छापतोय याचे भानही संपादकांना नसावे याचा खेद वाटतो , नुकतेच एका वर्तमानपत्रात

"आर्ची सैराटमध्ये
ज्या फांदीवर बसली होती ती तुटली "

या आशयाची बातमी प्रसिद्ध झाली आहे ,
या फांदीच्या तुटण्याने सैराट चित्रपटाचे व आर्चीचे चाहते चांगलेच हळहळत असुन जणू काही महाराष्ट्राचा  फार मोठा ठेवा नष्ट झाल्याचा सुर या बातमीत आहे ,
आणि सरकारने याची तातडीने दखल घेऊन काही उपाय योजना करावी अन्यथा वठलेले झाडही नामशेष होईल असा आशय आहे ,
एकीकडे शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधताना मोठ्या हिकमतीने मिळवलेले संपुर्ण महाराष्ट्रभर असणारे गड व कोट यांचे संवर्धन , जतन याविषयी बातम्या छापण्यासाठी तुमच्याकडे जागा नसते , ज्या गड किल्ल्यांपासुन भावी पिढीला खरी प्रेरणा मिळेल अशांच्या बातम्या लावण्यात तुम्हाला काही स्वारस्य नसते
  सध्या वर्तमानपत्रांपुढे अशा सवंग प्रसिद्धी मिळवणार्या बातम्या छापण्यापेक्षा , जनतेच्या असुविधा , तक्रारी , भ्रष्टाचार , गुन्हेगारी , बेरोजगारी या समस्या सोडवण्याचे कितीतरी मोठे आव्हान असताना ज्याला शेंडा नाही अन बुडकाही नाही अशा चटपटीत बातम्या छापणे म्हणजे वाचकांशी केलेली प्रतारणाच होय !

No comments:

Post a Comment