महावितरणने डिसेंबर २०१६ पासून आणखी एका आकाराची आकारणी करण्यास सुरुवात केली असून प्रतियुनिट १ रुपये १८ पैसे असा आकार बिलांमधून छापून त्याची वसुलीही सुरु केली आहे , १ महिन्याच्या वीज बिलात स्थिर आकार , वीज आकार , इंधन समायोजन आकार , वीज शुल्क , वीज विक्री कर असे ५ प्रकारचे वेगवेगळे चार्जेस घेतले जात आहेत त्यात आता वहन आकाराची भर पडली आहे , मूळ वीज वापराच्या ४० टक्के जादा बिल आता ग्राहकांना भरावे लागणार आहे , ग्राहकांनी एकजूट होऊन या अन्यायी वहन आकाराला तीव्र विरोध करावा ,
वहन आकार म्हणजे वीजकेंद्रापासून ग्राहकांपर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी येणार खर्च , आणि ग्राहक कायद्याने हा वहन कर आकारणे चुकीचे आहे कारण वीज हि काय स्वतः जाऊन पिशवीत घेऊन येण्याची वस्तू नाही , या अगोदरच विज आकारामध्ये याचा समावेश आहे ,
महावितरणचे अच्छे दिन लोकांना जोर का झटका धीरेसे देणारे आहेत , पण नागरिकही सुज्ञ आहेत ते याबद्दल आवाज उठवणारच
No comments:
Post a Comment